Chhatrapati sambhaji nagar News: सिनेमाला लाजवेल असा प्रकार, चक्क 4 वर्षांपूर्वी खोदलेली विहीर गेली चोरीला; शेतकऱ्याची हायकोर्टात धाव

हीच चार वर्षांपूर्वी खोदलेली विहीर चोरीला गेल्याचं प्रकरण थेट हायकोर्टात पोहचलं आहे.
representative image
representative imagesaam tv
Published On: 

Chhatrapati sambhaji nagar: बीड येथे विहीर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षांपूर्वी ही विहीर चोरीला गेली होती. हीच चार वर्षांपूर्वी खोदलेली विहीर चोरीला गेल्याचं प्रकरण थेट हायकोर्टात पोहचलं आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा प्रकार बीडमध्ये घडला आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्याला कल्पनाही नसताना, त्याच्या शेतात चार वर्षांपूर्वी विहीर खोदली गेली. इतकेच नव्हे तर विहिरीसाठीचे ३ लाख रुपये शासकीय अनुदानसुद्धा परस्पर उचलले. हा सर्व प्रकार चार वर्षांपूर्वी झाल्याची शासकीय दप्तरातील नोंद पाहून त्याला धक्काच बसला.

representative image
Ahmednagar Crime News : गुंडागर्दीवर पोलिसांचा धाकच उरला नाही, राष्ट्र्वादीच्या आमदाराची गृहखात्यावर टीका

यानंतर सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई झाली नाही, म्हणून त्या शेतकऱ्याने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.अखेर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा देत या शेतकऱ्याची याचिकाही निकाली काढली आहे.

साहेबराव सखाहरी जाधव हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील शेलगाव गंजी येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी ४ वर्षापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत परस्पर २ लाख ९९ हजार रुपये अनुदान मंजूर करून घेतले गेले. बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी करून २०१६ सालीच अनुदानही उचलले गेले.

४ वर्षानंतर २०२० ला साहेबरावच्या गोंधळ झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी केजचे गटविकास अधिकारी यांना ४ ऑगस्ट २०२२ ला आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना २६ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदन दिले. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही म्हणून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

representative image
Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar : शरद पवार आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या भेटीत नेमकं काय झालं?, प्रफुल्ल पटेल म्हणाले...

सुनावणीदरम्यान थेट याचिका दाखल करण्यापेक्षा संबंधितावर गुन्हा दाखल का केला नाही? अशी विचारणा न्यायालयाने केली. आता संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि याचिका मागे घेण्याची परवानगी देण्याची विनंती केली. या विनंतीवर निर्णय देताना खंडपीठाने आदेश दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.