Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की, शरद पवार आमचे सर्वांचे आदरनीय नेते शरद पवार म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो.
वेळ न मागता आम्ही येथे आलो. आम्हाला समजलं होतं की ते येथे आहेत. त्यामुळे संधी साधून आम्ही सगळे येथे आलो. आम्ही पवार साहेबांकडे आशिर्वाद मागितले. पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे, असं प्रुफल्ल पटेल यांनी म्हटलं. (Political News)
पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमचं मत ऐकून घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. उद्यापासून आम्ही आपापल्या विभागाची जबाबादारी विधानसभेमध्ये पार पाडू, असंही प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार सर्व मंत्र्यांना घेऊन वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना शरद पवाराचा आशिर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.