Weather Update : उन्हाचा चटका अन् उकाड्यात वाढ; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. सोलापुरात ३७.६ अंश तापमानाची नोंद झाली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं
Maharashtra Weather News Saam tv
Published On

राजस्थानातून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण तयार होत असतानाच महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात उन्हाचा चटका आणि उकाडा प्रचंड वाढला आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सध्याची हवामान प्रणाली (Weather Systems)

कमी दाबाचा पट्टा: मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, सौराष्ट्र परिसरावरील कमी दाब प्रणालीपासून बिकानेर, रोहतक, बरेली, देहरी, रांची, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, तेथून मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं
Maharashtra Weather : राज्यात उकाडा वाढला, पण या ९ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

उत्तर थायलंड परिसरावर चक्री वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे उत्तर अंदमान समुद्रात १९ सप्टेंबरपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली ओडिशा-आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे येताना अधिक तीव्र होऊ शकते.

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं
Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

विजांसह हलक्या पावसाचा अंदाज असणारे जिल्हे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश भागात मुख्यत्वे उघडीप आणि ढगाळ हवामान राहील, मात्र खालील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वळीव स्वरूपाच्या हलक्या सरी कोसळू शकतात:

सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, सोलापूर, तसेच पुणे, सातारा व कोल्हापूरचे घाटमाथा परिसर, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com