Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात हवामानात चढ-उतार सुरू असून हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचा अंदाज.
Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Maharastra Heavy Rain Weather Update Today News Saam tv
Published On
Summary
  • राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

  • तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

  • गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला

  • पुढील काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता

राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून अनेक भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली, तरी तुरळक भागांत हलक्या सरींचा शिडकावा होत आहे. हवामान विभागाने आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. विशेषतः दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागांतही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, अधूनमधून ऊन पडण्यासोबत हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चुकूनही 'या' रंगांचे कपडे घालू नका! नाहीतर.....

गेल्या काही दिवसांत अनेक भागांत पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मात्र, वातावरणात आर्द्रता असल्याने स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत (ता. २९) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानाच्या स्थितीत आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

याशिवाय, आग्नेय उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या दोन्ही हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे देशातील काही भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणी अचानक सरी आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com