Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट; कोणकोणत्या जिल्ह्यांत मुक्काम? वाचा वेदर रिपोर्ट

Maharashra Rain News : गणेशोत्सवात राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
Weather Updates 3 September 2024
Weather Updates 3 September 2024Saam TV
Published On

गणेशोत्सवात राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर ११ सप्टेंबरलाही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Weather Updates 3 September 2024
Jayakwadi Dam Water : मोठी बातमी! जायकवाडी धरणाचे तब्बल ६ दरवाजे उघडले; गोदावरी नदीला मोठा पूर, पाहा VIDEO

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यात पाऊस हजेरी (Maharashtra Rain) लावणार आहे. मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. तर बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये दिवसभर पावसाची शक्यता (Heavy Rain Today) आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात रिमझिम पावसाचा अंदाज आहे. पुण्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे, सातारा व विदर्भ वगळता सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा तयार होण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक धरणं शंभर टक्के भरली

पावसाची संततधार सुरु असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक धरणं काठोकाठ भरली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटलाय. दुसरीकडे संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात तब्बल 98 टक्के पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com