Maharashtra weather: राज्यात पुन्हा बदलणार हवामानाचा अंदाज; या जिल्ह्यांत आज जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस

IMD Weather Prediction: आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसंच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
IMD Weather Prediction
IMD Weather Predictionsaam tv
Published On

राज्यात सध्या मॉन्सूनच्या पावसाचा जोर कमी झालाय. मात्र, विजांसह पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्यातील इतर भागांत ढगाळ हवामान राहून हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सध्या ईशान्य मध्य प्रदेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या क्षेत्राला लागून समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील अमृतसर, मुझफ्फराबाद, कानपूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दाल्तोंगंज, दिघामधून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.

IMD Weather Prediction
Road Accident: भरधाव गाडीने घेतला 26 वर्षीय तरुणीचा जीव; खासदाराच्या 21 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात सोलापूर याठिकाणी सर्वाधिक ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वांत कमी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तसंच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. आज सोलापूरसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

IMD Weather Prediction
Gold Mine Accident: सोन्याच्या खाणीत अचानक दरड कोसळली, 100 हून अधिक जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक मजूर अडकले

शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदवलेलं तापमान

ठिकाणे- कमाल तापमान- किमान तापमान

  • पुणे : २८.९ / २२

  • अहिल्यानगर : ३०.८ / २४.७

  • जळगाव : ३२.४ / २१.८

  • जेऊर : ३३ / २०.५

  • कोल्हापूर : २८.५ / २२.१

  • महाबळेश्वर : १९.६ / १७.४

  • मालेगाव : ३१.४ / २१.८

  • नाशिक : २७.७ / २१.६

  • निफाड : २९.८ / २१.९

  • सांगली : ३०.७ / २२.२

  • सातारा : २८.८ / २२.३

  • सोलापूर : ३३.४ / निरंक

  • सांताक्रूझ : ३१ / २६.६

  • डहाणू : ३२.७ / २४.३

  • रत्नागिरी : ३०.५ / २६

  • छत्रपती संभाजीनगर : ३०.६ / २२

  • धाराशिव : ३०.८ / २०.७

  • परभणी : ३२.५ / २२

  • परभणी (कृषी) : ३२ / २१.१

  • अकोला : ३०.२ / २४.५

IMD Weather Prediction
Maharashtra FDA: तेलामुळे कॅन्सरचा धोका? FDA ॲक्शन मोडमध्ये; तुकाराम मुंढेंचा इशारा, नियम तोडल्यास 10 लाख दंड
  • अमरावती : ३०.२ / २२.९

  • ब्रह्मपुरी : ३२.९ / २३.५

  • बुलडाणा : ३०.६ / २२.३

  • चंद्रपूर : ३२.६ / २५.०

  • गडचिरोली : ३०.४ / २४.८

  • गोंदिया : ३१.४ / २२.२

  • नागपूर : ३३.२ / २३.६

  • वर्धा : ३२.५ / २४.५

  • वाशीम : २८.६ / २०.२

  • यवतमाळ : २८.४ / १८.४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com