Thane Water Supply: ठाण्यात पाणीबाणी; शुक्रवारी काही भागांत पाणीपुरवठा बंद, दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पुरवठा

Thane Water Shortage: शुक्रवार दि. १३ डिसेंबर आणि शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी ठाण्यात काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेले आहे. हे दोन दिवस ठाणे आणि इतर काही भागांत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा होणार आहे.
Thane Water Shortage
Thane Water Shortageyandex
Published On

ठाण्यात शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहण्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील काही भागांमध्ये दोन दिवस टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिका (TMC) ने शहरवासीयांना याबाबत सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा बंद राहण्याचे मुख्य कारण म्हणजे जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू असलेली जलवाहिन्यांची दुरुस्ती या कामामुळे ठाण्याच्या पाणीपुरवठा योजनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठाणे महापालिकेला प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० तेशनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० असे २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात देखभाल, दुरुस्ती आवश्यक कामे तातडीचे करण्यात येणार आहे. घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डॉगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा १३ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत बंद राहील.

Thane Water Shortage
Mumbai Air Pollution: नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईच्या हवेची गुणवत्ता आणखी बिघडली, कुलाबा आणि कांदिवलीची हवा अधिक धोकादायक

तत्पूर्वी, पाणी कमी मिळालेल्या भागांमध्ये टँकर सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी टँकर सेवा आणि पाणी साठवणुकीसाठी योग्य तयारी करावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांना पाणी कमी लागणाऱ्या काही भागांमध्ये ठराविक वेळेस पाणी मिळेल. पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे.

Thane Water Shortage
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी अपडेट, खोटी माहिती देत असाल तर सावधान...

दरम्यान, वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ठाण्यात पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची योजना आहे. नागरिकांना होणाऱ्या अडचणींचे प्रशासन गांभीर्याने लक्षात घेत आहे आणि यावर उपाययोजना करण्याची गती लावली आहे.

Thane Water Shortage
Health: ध्यान करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या महत्त्व

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com