घरगुती वाद टोकाला गेला, विवाहित तरुणाचा हादरवणारा निर्णय; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

washim Shocking : घरगुती वाद टोकाला गेल्यानंर विवाहित तरुणाने कुटुंबातील तिघांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
washim shocking
washim news Saam tv
Published On
Summary

वाशिममध्ये घडली धक्कादायक घटना

वाशिममध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

विवाहित तरुणाने तिघांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय

मनोज जैस्वाल, साम टीव्ही

वाशिममधून धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील तिवळीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीसह दोन चिमुकल्या मुलांना विहिरीतून टाकल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

देशासहित महाराष्ट्रात घरगुती वादाचे प्रकरणात वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रातही घरगुती वादातून हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. वाशिममध्येही घरगुती वादातून धक्कादायक घटना घडली आहे. वाशिमच्या तिवळी गावात ३५ विवाहित तरुणाने घरगुती वादानंतर हादरवणारा निर्णय घेतलाय.

washim shocking
Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

३५ वर्षीय संतोष तुकाराम बकाल (वय ३५) यांनी महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. वाशिममधील घटनेतील मृतांमध्ये पत्नी वर्षा बकाल (वय २८), मुलगी जान्हवी बकाल (वय ७) आणि मुलगा सोहम बकाल (वय ५) यांचा समावेश आहे.

दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. मात्र या घटनेला अधिकृत दुजोरा कोणीही अद्याप कुणीही दिलेला नाही. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

washim shocking
मुलीने 'लव्ह मॅरेज' केलं, कुटुंबीय संतापले; रागाच्या भरात बापाने आयुष्य संपवलं

उत्तर प्रदेशात बापाकडून १९ वर्षीय मुलीची हत्या

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात शुक्रवार हादरवणारी घटना घडली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच नराधम बापाने १९ वर्षीय मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलीस ठाण्याच्या सुरक्षित परिसरात घडली आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. बापाने मुलीची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com