मुलीने 'लव्ह मॅरेज' केलं, कुटुंबीय संतापले; रागाच्या भरात बापाने आयुष्य संपवलं

uttar pradesh shocking : मुलीने प्रेम विवाह केल्याने रागाच्या भरात बापाने आयुष्य संपवलं आहे. बापाने टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
uttar pradesh shocking news
uttar pradesh Saam tv
Published On
Summary

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली धक्कादायक घटना

मुलीने प्रेमविवाह केला, बापाने आयुष्य संपवलं

बापाने आयुष्य संपवल्याने परिसरात शोककळा

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने बापाला मोठा धक्का बसला. मुलीच्या प्रेमविवाहानंतर रागाच्या भरात बापाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती कळूनही मुलगी आणि तिचा नवरा अंत्यविधीलाही पोहोचले नाहीत. या घटनेने मुरादाबाद परिसरात खळबळ उडाली आहे.

मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. २४ वर्षीय मुलगी १४ मे रोजी अचानक घर सोडून गेली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं काकीचा भाचा म्हणजे मावस भावासोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना समजली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा विवाह दुसर्‍या ठिकाणी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

परंतु कुटुंबातील सदस्यांवर नाराज होऊन मुलगी १४ मे रोजी घरातील दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली. काही दिवसांनी या जोडप्याने लग्न केल्याची माहिती समोर आली. मुलगी अचानक घर सोडून गेल्याने समाजात चर्चा होऊ लागली. यामुळे मुलीच्या बापाला मोठा धक्का बसला होता. मुलीच्या निर्णयाने कुटुंबातील लोकांनी खाणे-पिणे देखील सोडल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या विवाहानंतर कुटुंबीय मानसिक तणावात होते.

uttar pradesh shocking news
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

या मानसिक तणावादरम्यान मुलीच्या वडिलांनी टोकाचा निर्णय घेतला. मुलीच्या बापाने टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला. बापाने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी मुलीला दिली. परंतु बापाच्या अंत्यसंस्काराला देखील मुलगी आली नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पुढाकार घेऊन मुलीच्या बापावर अंत्यसंस्कार केले. बापाच्या अंत्यविधीलाही मुलगी आणि जावई न आल्याने समाजात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

uttar pradesh shocking news
Pune : पुण्यात चाललंय काय? आईस्क्रीम विक्रेत्याकडून १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग; नागरिकांमध्ये संताप

या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार, मुलीने लग्नाचे फोटो प्रशासनाला पाठवले आहेत. लग्न स्वमर्जीने केल्याचाही तरुणीचा दावा आहे. प्रयागराज पोलीस दोघांच्या शोधावर आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक देखील रवाना झालं आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com