Pune : पुण्यात चाललंय काय? आईस्क्रीम विक्रेत्याकडून १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग; नागरिकांमध्ये संताप

Pune Crime News : मुळशी तालुक्यात आईस्क्रीम विक्रेत्याकडून १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ICE CREAM VENDOR MOLESTS MINOR GIRL IN MULSHI PUNE ACCUSED ARRESTED
ICE CREAM VENDOR MOLESTS MINOR GIRL IN MULSHI PUNE ACCUSED ARRESTEDSaam Tv
Published On
Summary
  • मुळशी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • आईस्क्रीम विक्रेत्यावर गंभीर आरोप

  • ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातील नरसापूर परिसरातील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच मुळशी तालुक्यात एका गावात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. दुचाकीवरून फिरत आईस्क्रीम विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान चुलत बहिणीसह घराजवळ आलेल्या आईस्क्रीम विक्रेत्याकडे आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी पिंटू शिवकुमार याने मुलीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ येत अश्लील कृत्य करत विनयभंग केला.

ICE CREAM VENDOR MOLESTS MINOR GIRL IN MULSHI PUNE ACCUSED ARRESTED
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने तत्काळ आरडाओरडा करत घरी धाव घेतली आणि घडलेली घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळातच आरोपीला पकडण्यात आले आणि त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ICE CREAM VENDOR MOLESTS MINOR GIRL IN MULSHI PUNE ACCUSED ARRESTED
Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

पौड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्रमांक १२३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com