Maharashtra weather today: महाराष्ट्रात आज वादळी पावसाचा इशारा; 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट, अनेक ठिकाणी उन्हाचा चटका

Maharashtra Monsoon Prediction: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 36.2 अंश तापमानाची नोंद झाली.
Maharashtra weather today
Maharashtra weather todaysaam tv
Published On

राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतलीये. त्यामुळे काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढला असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत. दरम्यान आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील इतर भागांतही काही ठिकाणी विजांसह पाऊस पडू शकतो.

'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट

आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झालीये. पावसासाठी पोषक असलेला कमी दाबाचा पट्टा आता कमी झाला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. मन्नारच्या आखातापासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंतही कमी दाबाचा पट्टा असल्याचे हवामान विभागाने सांगितलंय.

Maharashtra weather today
Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र

दरम्यान उत्तर अंदमान समुद्राच्या परिसरात समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालीये. या हवामान प्रभावामुळे उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत म्हणजेच 23 सप्टेंबरपर्यंत ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सोलापुरात सर्वाधिक तापमान

शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर चंद्रपूरमध्ये 35.8, अमरावतीत 35.6, अकोल्यात 35.1, जेऊर आणि ब्रह्मपुरीमध्ये प्रत्येकी 35 अंश, तर वर्ध्यात 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलंय. राज्यातील सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये नोंदलं गेलं. त्याठिकाणी किमान तापमान 17.8 अंश सेल्सिअस होते.

देसाईगंजमध्ये 60 मिमी पाऊस

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये सर्वाधिक 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Maharashtra weather today
Weather forecast: शास्त्रज्ञ कसा लावतात हवामान आणि पावसाचा अंदाज?

विविध शहरांतील कमाल-किमान तापमान

  • पुणे: कमाल 30.9°, किमान 22.7°

  • अहिल्यानगर: कमाल 33.6°, किमान तापमानाची नोंद नाही

  • धुळे: कमाल 33.0°, किमान 19.4°

  • जळगाव: कमाल 34.2°, किमान 23.2°

  • जेऊर: कमाल 35.0°, किमान 22.0°

  • कोल्हापूर: कमाल 32.3°, किमान 22.7°

  • महाबळेश्वर: कमाल 21.6°, किमान 17.8°

  • मालेगाव: कमाल 33.2°, किमान 20.6°

  • नाशिक: कमाल 29.5°, किमान 22.0°

  • निफाड: कमाल 31.7°, किमान 20.7°

  • सांगली: कमाल 33.9°, किमान 22.5°

  • सातारा: कमाल 32.7°, किमान 22.1°

  • सोलापूर: कमाल 36.2°, किमान 24.5°

  • सांताक्रूझ: कमाल 31.4°, किमान 25.0°

  • डहाणू: कमाल 31.6°, किमान 23.9°

  • रत्नागिरी: कमाल 32.0°, किमान 24.7°

  • छत्रपती संभाजीनगर: कमाल 33.5°, किमान 22.9°

  • धाराशिव: कमाल 32.9°, किमान 22.0°

  • परभणी: कमाल 30.9°, किमान 23.0°

  • परभणी (कृषी): कमाल 28.7°, किमान 22.0°

  • अकोला: कमाल 35.1°, किमान 24.3°

  • अमरावती: कमाल 35.6°, किमान 23.7°

  • ब्रह्मपुरी: कमाल 35.0°, किमान 22.8°

  • बुलडाणा: कमाल 32.6°, किमान 23.0°

  • चंद्रपूर: कमाल 35.8°, किमान 25.0°

  • गडचिरोली: कमाल तापमानाची नोंद नाही, किमान 24.2°

  • गोंदिया: कमाल तापमानाची नोंद नाही, किमान 21.2°

  • नागपूर: कमाल 34.7°, किमान 20.6°

  • वर्धा: कमाल 35.0°, किमान 23.8°

  • वाशीम: कमाल 32.4°, किमान 21.0°

  • यवतमाळ: कमाल 33.6°, किमान 20.6°

विभागनिहाय सरासरी तापमान

  • उत्तर महाराष्ट्र: किमान 19.4°, कमाल 34.2°

  • पश्चिम महाराष्ट्र: किमान 17.8°, कमाल 36.2°

  • कोकण: किमान 23.9°, कमाल 32.0°

  • मराठवाडा: किमान 22.0°, कमाल 33.5°

  • विदर्भ: किमान 20.6°, कमाल 35.8°

आज कुठे पावसाचा येलो अलर्ट?

  • कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

  • मध्य महाराष्ट्र: नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

  • मराठवाडा: बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड

  • विदर्भ: अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

Maharashtra weather today
Weather Update : उन्हाचा चटका अन् उकाड्यात वाढ; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

कुठे उन्हाचा चटका अधिक?

सध्या राज्यात सोलापूरमध्ये सर्वाधिक 36.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर चंद्रपूर 35.8, अमरावती 35.6, अकोला 35.1, जेऊर 35, ब्रह्मपुरी 35 आणि वर्धा येथे 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com