Wardha News: दरोडा टाकून काढला पळ, सापळा रचत आरोपींना सिनेस्टाईल अटक; अटकेचा थरारक CCTV व्हिडीओ

Nagpur Robbery Accused Arrested In Wardha: नागपूरमध्ये सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल अटक केली. नागपुरहून वर्धापर्यंत पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नागपूरमध्ये दरोडा, वर्ध्यापर्यंत पाठलाग, आरोपीला सिनेस्टाईल अटक,  पाहा VIDEO
Nagpur robbery accused arrested in WardhaSaam Tv
Published On

Summary -

  • नागपूर लुटपाट प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी वर्ध्यात केली अटक.

  • मस्जिद चौकात सिनेस्टाईल अटक करण्यात आली.

  • आरोपींच्या अटकेचा थरारक CCTV व्हिडीओ व्हायरल.

  • आरोपींकडून देशी कट्टा आणि मुद्देमाल जप्त.

चेतन व्यास, वर्धा

नागपुरमध्ये दरोडा टाकून वर्धेत आलेल्या दरोडेखोरांना सापळा रचत पोलिसांनी अटक केली. भररस्त्यात गाडी अडवून पोलिांनी आरोपींना अटक केली. वर्धा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने आरोपी अटक केली. आरोपींच्या सिनेस्टाईल अटकेचा थराराचा व्हिडिओ सोशल मीडिावर व्हायरल होत आहे. वर्धेच्या मस्जिद चौकात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या बोरी येथे देशी दारू दुकानदाराला देशी कट्टा दाखवत आरोपीनी लुटपाट केली होती. लुटपाट करून आरोपी वर्धेच्या दिशेने पळाले असल्याचे पोलिसांना लक्षात येताच नागपूर पोलिसांनी वर्धा पोलिसांना याची माहिती दिली. आरोपी वर्धेत आल्याची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी शोध मोहीम राबविली. अशातच वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला आरोपी वर्धेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने शोधमोहीम सुरू केली.

नागपूरमध्ये दरोडा, वर्ध्यापर्यंत पाठलाग, आरोपीला सिनेस्टाईल अटक,  पाहा VIDEO
Solapur Crime : जेवत नाही, शाळेत जात नाही म्हणून राग; सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मस्जिद चौकात पोहचत आरोपीना बेड्या ठोकल्या. पोलिसांना पाहताच आरोपीनी कारसह पळून जाण्याचा केला प्रयत्न पण पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने त्यांना अटक केली. आरोपीकडून दोन देशी कट्टा जप्त करण्यात आले. आरोपींच्या अटकेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी या प्रकरणात ४ आरोपींना अटक केली तर एक जण फरार झाला आहे.

नागपूरमध्ये दरोडा, वर्ध्यापर्यंत पाठलाग, आरोपीला सिनेस्टाईल अटक,  पाहा VIDEO
Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

रवींद्र सिंग लखन सिंग जुनी, तुषार दामोदर सहारे, नयन दत्ताजी कडू, कुणाल हेमने अशी अटक केलेल्या आरोपींची नाव असून एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. अटक आरोपीना वर्धा पोलिसांनी नागपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. वर्धा पोलिसांच्या तत्परतेने आरोपींना अटक करण्या यश आले.

नागपूरमध्ये दरोडा, वर्ध्यापर्यंत पाठलाग, आरोपीला सिनेस्टाईल अटक,  पाहा VIDEO
Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com