
संजय गडदे, साम टीव्ही
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना पाच लाख रुपयांची खंडणी घेताना एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. हा सर्व प्रकार स्टिंग ऑपरेशनद्वारे चित्रीत करण्यात आला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कमलेश राय यांचा व्हायरल झालेल्या स्टिंग व्हिडिओमध्ये अनेक गंभीर दावे करण्यात आले आहेत. "जर कुणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझी तक्रार केली, तर त्यांच्याकडून मला थेट कॉल येतो," असा धक्कादायक दावा राय यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.
तसेच, "मागच्या दोन नंबर रस्त्यावरच्या बांधकाम व्यावसायिकांनी माझ्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सचिन जोशी आणि सचिव रेपाळे यांचा मला कॉल आला," असा खुलासाही त्यांनी त्यात केला आहे.
या प्रकारामुळे शिंदे गटात खळबळ माजली आहे. राजकीय दबाव, सत्तेचा वापर आणि भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहे. या प्रकरणात लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
नाशिक इंदिरानगर पाथर्डी फाटा परिसरातील रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बार सुरु ठेवण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्याने सात लाख रुपये खंडणीची मागणी केली. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट)च्या महिला पदाधिकाऱ्यासह तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पंढरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.