Wardha News
Wardha NewsSaam tv

Wardha News: वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशातील आरक्षण पूर्ववत करा; बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशातील आरक्षण पूर्ववत करा; बहुजन समाज पार्टीचे आंदोलन
Published on

चेतन व्यास

वर्धा : वैद्यकीय शिक्षणाकारिता प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा टक्का कमी करण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर (Wardha News) मोर्चा काढत आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवाना निवेदन देण्यात आले. यावेळी आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. (Breaking Marathi News)

Wardha News
Crime News: क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे हरला; बेटिंग घेणाऱ्यानी केला बांधकाम व्यावसायिकाचा खून

वैद्यकीय प्रवेशकारिता ओबीसी समाजाला 27 टक्के, अनुसूचित जातीला 13 टक्के तर अनुसूचित जमातीला 7.5 टक्के आरक्षण देण्यात येत होतें. मात्र आता सरकारने हा टक्का कमी करून ओबीसी समाजाला 8 टक्के, अनुसूचित जातीला 6 टक्के तर अनुसूचित जमातीला 3 टक्के करण्यात आला आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे (Student) नुकसान होत आहे.

तिव्र आंदोलनाचा इशारा

सदरचा निर्णय सरकारने परत घेत पूर्वीप्रमाणे आरक्षण द्यावा; अशी मागणी बहुजन समाज पार्टीकडून करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com