Wardha News : वर्ध्यात वणा नदीच्या पुलावर भीषण अपघात; माय-लेकाचा जागीच मृत्यू

Wardha Accident News : वर्ध्यातील हिंगणघाट येथे आज भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. नागपूरहून हैदराबादकडे जाताना ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोराची धडक बसल्यामुळे हा अपघात घडला.
Wardha News
Wardha NewsSaam Digital
Published On

चेतन व्यास

वर्धा हिंगणघाटमधील वणा नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोराची धडक बसल्यामुळे आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरहून हैदराबादकडे जाताना हा अपघात घडला आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. आई आणि मुलाचा असा अपघाती मृ्त्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आरती वाघमारे वय 42 व अक्षय वाघमारे वय 24 अशी मृतकांची नावं आहे. घटनेनंतर या मार्गांवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग 44 हा हिंगणघाट शहरातून जातो. या मार्गांवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास हैद्राबाद येथून नागपूरला प्रवासी घेऊन जातं असलेल्या ट्रॅव्हल्सने वर्धेतून हिंगणघाटला जाणाऱ्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार माय लेकाचा जागीच मृत्यू झालाय.

Wardha News
Kolhapur Crime News : काेल्हापूरच्या ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरासह कसबा बावड्यात चाेरट्यांचा धुमाकूळ

दोन्ही मृतक हे वर्धेच्या फुलफैल परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेनंतर या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवीच्छेदनासाठी हिंगणघाट रुग्णालयात पाठवले. प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Wardha News
कृषी केंद्र व्यापाऱ्यास मारहाण, घरावर दरोडा; 40 ताेळे दागिन्यांसह 22 लाखांची लूट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com