Cyber Crime: व्हिडीओ कॉल करून आर्मी जवानांची तपासणीसाठी विनंती; बारकोड पाठवून डॉक्टरसह परिचारिकेला गंडा

व्हिडीओ कॉल करून आर्मी जवानांची तपासणीसाठी विनंती; बारकोड स्‍कॅनला पाठवून डॉक्टरसह परिचारिकेला गंडा
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : एनसीसी तसेच आर्मीच्या जवानांना तपासणी करायची असल्याची खोटी माहिती सांगून एका खासगी डॉक्टरसह शासकीय रुग्णालयातील (Hospital) परिचारिकेला सायबर भामट्यांनी गंडविल्याची घटना उजेडात आली. खासगी डॉक्टराला (Doctor) पाच हजार रुपयांनी तर परिचारिकेला तब्बल २४ हजारांनी गंडा घातला. या दोन्ही घटनेची तक्रार सायबर सेलकडे देण्यात आली. (Tajya Batmya)

Cyber Crime
Beed News: खाडाखोड करुन दहावी नापासचा झाला पास; नोकरीही मिळवली, ४ वर्षानंतर उघडकीस आला प्रकार

शासकीय रुग्णालयातील परिचारिका सकाळी घरी असताना तिच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल आला आणि समोर एक एनसीसीची ‘वर्दी’ परिधान केलेला अधिकारी बोलू लागला. परिचारिकेला तो अधिकारी असल्याचा विश्वास (Cyber Crime) बसला. त्याने आम्हाला एनसीसीच्या २० जवानांची आरोग्य तपासणी करायची आहे; असे सांगून बार कोड स्कॅन करायला लावले. बार कोड स्कॅन करताच परिचारिकेच्या बॅंक खात्यातून २४ हजारांची रक्कम कपात झाली. तेव्हा परिचारिकेला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट सायबर सेल गाठून याबाबतची तक्रार दाखल केली.

डॉक्‍टरलाही फसविले

दुसऱ्या घटनेतही शहरातील एका खासगी डॉक्टरला व्हिडीओ कॉल करुन आर्मी अधिकारी बोलत असल्याचे दाखवून २० जवानांची आरोग्य तपासणी करायची असे सांगून बार कोड स्कॅन करण्यास सांगितले. डॉक्टरने बार कोड स्कॅन करताच पाच हजारांची रक्कम परस्पर काढून घेत डॉक्टरची फसवणूक केली. एकाच पाठोपाठ घडलेल्या दोन ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. दोन्ही घटनांची तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे करण्यात आली असून पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलमधील पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com