Wardha : माझ्या वडिलांच्या आरोपींना फाशी द्या... भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षाच्या लेकाची मागणी

Wardha Businessman Bharat Nagpal Murder Case : वर्धा जिल्ह्यातील उद्योजक भारत नागपाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आणि तपास सीआयडीकडे देण्याची मागणी करत वर्ध्यात मूक विरोध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागपाल यांच्या दोन वर्षांच्या मुलाने न्यायाची मागणी केली.
Wardha : माझ्या वडिलांच्या आरोपींना फाशी द्या... भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षाच्या लेकाची मागणी
Wardha Businessman Bharat Nagpal Murder Case Saam Tv
Published On
Summary
  • उद्योजक भारत नागपाल यांची निर्घृण हत्या

  • या प्रकरणात १२ आरोपींना अटक

  • आरोपींना फाशीची शिक्षा आणि तपास सीआयडीकडे देण्याची मागणी

  • नागपाल यांच्या दोन वर्षांच्या मुलाने केली न्यायाची मागणी

चेतन व्यास, वर्धा

Wardha BJP Leader Bharat Nagpal Murder वर्धा जिल्ह्याच्या पुलगांव येथील व्यवसायी भारत नागपाल यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या बांबर्डा येथील वाळू घाटावर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेतील बारा आरोपींना वरोरा पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच विविध मागण्यांसाठी वर्धा येथे मूक विरोध मोर्चा काढत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात भारत यांचा दोन वर्षाचा चिमुकला वेदराज हा आपल्या वडिलांच्या आरोपींना तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी विनवणी करत होता.

भारत नागपाल यांची होळीच्या पूर्वसध्येला वाळू घाटात कट रचून हत्या करण्यात आली होती. नागपाल हे पूलगांव येथील उद्योजक असून भाजपाचा महामंत्री होते. नागपाल यांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत सुद्धा पाहायला मिळाले.

Wardha : माझ्या वडिलांच्या आरोपींना फाशी द्या... भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षाच्या लेकाची मागणी
Titwala : टिटवाळ्यात टोळक्यांकडून घरावर हल्ला, संपूर्ण कुटुंबाला लोखंडी हत्याराने बेदम मारहाण

या घटनेतील बारा आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देत जलदगतीने करत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा या मागणीसाठी वर्ध्यात आज नामदेव मठ येथून मूक विरोध मोर्चा काढण्यात आलं. मोर्चा शहराच्या

Wardha : माझ्या वडिलांच्या आरोपींना फाशी द्या... भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षाच्या लेकाची मागणी
Shocking : पालकांनो सावधान! ऑटोमॅटिक लॉकमुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला; अशी झाली सुटका, पाहा Video

मुख्यमार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या मोर्चात भारत यांचा दोन वर्षाचा चिमुकला हातात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणीचा फलक घेऊन होता. सोबतच नागपाल यांचे बंधू दिनेश आणी राम हे सुद्धा उपस्थित होते.शहरात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.यासोबतच पंजाबी समाज आणी मित्र परिवार सुद्धा भारतला न्याय देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com