शहापूरमधील रूग्णालयातच भिडले दोन गट, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; डॉक्टर,नर्स उपचार सोडून पळाले

Two Village Group Clash Inside Hospital : शहापूरमधील रुग्णालयात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. डॉक्टर आणि नर्स घाबरून बाहेर पळाले. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे.
Two Village Group  Clash Inside Hospital
A violent fight broke out between two groups at a hospital in Shahapur; police detained 10 people.saam tv
Published On
Summary
  • शहापूरमधील रुग्णालयात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.

  • जुन्या वादातून जखमींवर उपचार सुरू असताना पुन्हा संघर्ष उफाळला.

  • डॉक्टर आणि नर्स भीतीमुळे रुग्णालयातून बाहेर पळाले.

शहापूरमधील एका रुग्णालयात दोन गटात तुफान हाणामारी झाली. जुन्या वादातून दोन गटात मारामारी झाली. डोळखांब गावातील हे दोन गट असून यांच्या पूर्ववैमनस्य आहे. याप्रकरणी किन्हवळी पोलीसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी १० जणांना ताब्यात घेतले. तर 14 जण फरार झाले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही गटात आधी गावात हाणामारी झाली, त्यानंतर हाणामारीत झालेल्या जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, तेव्हा दुसऱ्या गटातील लोक जमली आणि त्यांनी पुन्हा जखमींना मारहाण केली. मारहाण करणारे डॉक्टर आणि नर्सची ऐकत नव्हते. इतकी भयानक हाणामारी पाहून डॉक्टर आणि नर्स यांनी उपचार सोडून रुग्णालयातून पळ काढला. रुग्णालयातील कर्मचारीही बाहेर पळून गेले. ही हाणामारी दोन तास सुरू होती, शेवटी डॉक्टरांनी किन्हवळी पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दहा जणांना ताब्यात घेतले असून बाकी 14 जण फरार झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com