MLC Election : निवडणुकीआधीच महायुतीने ६ जागा जिंकल्या, ११ जागांसाठी आज मतदान; साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत नगरसेवक बजावणार हक्क

Maharashtra Vidhanparishad Nivdnuk 2026 : महाराष्ट्रातील ११ विधान परिषद जागांसाठी आज मतदान होत असून महायुतीने आधीच ६ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. या मतदानाचा निकाल २२ जून रोजी जाहीर होणार आहे.
MAHARASHTRA MLC ELECTION 2026: VOTING ON 11 SEATS TODAY, MAHAYUTI WINS 6 UNOPPOSED
MAHARASHTRA MLC ELECTION 2026: VOTING ON 11 SEATS TODAY, MAHAYUTI WINS 6 UNOPPOSEDSaam Tv
Published On
Summary
  • राज्यातील 11 विधान परिषद जागांसाठी आज मतदान

  • महायुतीने मतदानाआधीच 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवला

  • मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.

  • विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी 22 जून रोजी होणार

Maharashtra Vidhanparishad Nivdnuk 2026 Update राज्यात आज ११ जागांवर विधान परिषदेच्या (MLC Election 2026) निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांचा निकाल २२ जून रोजी असून मतदानाआधीच महायुतीने मोठा राजकीय डाव साधत सहा जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीत कोण निवडून येणार आणि कोणाला रिकाम्या हाती जावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या ११ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील थेट लढती रंगल्या असून काही मतदारसंघांमध्ये तिरंगी संघर्षही पाहायला मिळत आहे.

MAHARASHTRA MLC ELECTION 2026: VOTING ON 11 SEATS TODAY, MAHAYUTI WINS 6 UNOPPOSED
Skin Care : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा

यंदाच्या निवडणुकीत ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे विजयी झाले आहेत.

MAHARASHTRA MLC ELECTION 2026: VOTING ON 11 SEATS TODAY, MAHAYUTI WINS 6 UNOPPOSED
Heart Care : बदाम की शेंगदाणे? हृदयासाठी सर्वात जास्त काय फायदेशीर?

सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे वसंतराव देशमुख यांच्यात सामना आहे. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे आमनेसामने आहेत.

MAHARASHTRA MLC ELECTION 2026: VOTING ON 11 SEATS TODAY, MAHAYUTI WINS 6 UNOPPOSED
Monsoon Update : उकाड्याने नागरिक हैराण! मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाचा वर्तवला अंदाज

विशेषतः नाशिक मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे रिंगणात असले तरी माघार घेतलेल्या गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची नावेही मतपत्रिकेवर कायम असल्याने निवडणुकीत वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com