.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Uddhav Thackeray Vidhan Parishad election 2026 decision : विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायला शेवटचा एक दिवस उरला आहे. पण मविआचा अजूनपर्यंत उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंनीच निवडणूक लढावावी, यासाठी आग्रह धरला आहे. तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील अशी माहिती ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार की नाही? याचा निर्णय आज होणार आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. संख्याबळानुसार यामधील एक जागा विरोधकांना मिळणार आहे. ती जागा ठाकरेंच्या शिवसेना लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण या जागेंवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोण मैदानात उतरले, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जावे, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मातोश्रीवर चकराही मारण्यात आल्या. पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे समजतेय.
एका जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघा एक दिवस उरला असून, महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवावी, यासाठी काँग्रेस सुरुवातीपासूनच आग्रही आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, "उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, ते पक्षप्रमुख असल्याने अंतिम निर्णय ते स्वतः घेतील." विधान परिषदेची एकच जागा असल्याने अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असून उद्धव ठाकरेंनी उमेदवार व्हावे, असे त्यांना कळवले आहे. मात्र, ठाकरे गटाकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या (३० एप्रिल) शेवटची तारीख असल्याने, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार की अन्य कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा ?
निवडणुकीची अधिसूचना जारी – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)
मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)
मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.