Yavatmal News: धक्कादायक प्रकार! यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या आईला डॉक्टरांकडून मारहाण

Government Medical College Hospital : नर्सच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या एका महिलेला डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात घडलीय.
Yavatmal News: धक्कादायक प्रकार! यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या आईला डॉक्टरांकडून मारहाण
Yavatmal Government Medical College Hospital
Published On

(संजय राठोड)

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात एक संतापजनक प्रकार घडलाय. एका रुग्णाच्या आईला तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केलीय. नर्सने दोन इंजेक्शन दिल्यामुळेच मुलाचा मृ्त्यू झाल्याची आरोप या महिलेने केला होता. त्यानंतर रुग्णाच्या आईला मारहाण करण्यात आलीय. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, बाभुळगांव तालुक्यातील गवळा गावात राहणारा श्याम ज्ञानेश्वर तिजारे हे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार चालू होता, मात्र उपचारादरम्यान श्याम तिजारे यांचा मृत्यू झाला. आपला मुलगा जग सोडून गेल्याने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

योग्य उपचार न झाल्याने मुलाचा मृत्यू झालाचा आरोप दु:खात बुडालेल्या आईने केला. नर्सने दोन इंजेक्शन दिल्यानेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानंतर रुग्णालयातील प्रशासन आणि मृतकांच्या नातेवाईकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर मृतक मुलाची आई डॉक्टरांना बोलवण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप केला.

दरम्यान मारहाण झालेल्या महिलेचं नाव अन्नपूर्णा तिजारे, असं आहे. रुग्णाच्या आईला मारहाण केल्यानंतर रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले. त्यानंतर तेथे ऑल इंडिया पॅथर सेनेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी दोन्ही डॉक्टरांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी केली. या सर्व प्रकरणावर रुग्णालयाच्या प्रशासनाने प्रतिक्रिया दिलीय.

रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारणही रुग्णालयाकडून देण्यात आले आहे. रुग्णाला टीबी, डायबिटीज होता. तीन दिवसापासून प्रकृती चिंताजनक होती. मृतक रुग्णाच्या आईशी कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे. असून त्याची सखोल चौकाशी समिती चौकशी करित आहेत. चौकाशी झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असं सतीश जतकर,आधिष्ठता म्हणालेत.

Yavatmal News: धक्कादायक प्रकार! यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या आईला डॉक्टरांकडून मारहाण
Zila Parishad School: यॅक यॅक! शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या; यवतमाळमधील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com