

हा व्हिडिओ नीट पाहा...माणुसकीला काळिमा फासणारी आणि कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडलीय....वसईत...वडिलांसोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालक संदीप पवार या विकृतानं चक्क चार वर्षांच्या चिमुरड्याला जमिनीवर आपटून आपटून आणि फरफटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय... या अमानुष कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि वसईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
वसईच्या अनुपम सोसायटीतल्या अतुल कोंढारेंचा रिक्षाचालक संदीप पवारशी वाद झाला...30 मार्चला संध्याकाळी सोसायटीत खेळताना कोंढारेंचा मुलगा रिक्षात बसला होता...त्यावेळी आरोपी संदीप पवार रिक्षाजवळ आला आणि त्याने इतर मुलांना हाकललं. 4 वर्षीय मुलाला पकडून आरोपीनं त्याचं डोक रिक्षाच्या मिटरजवळील लोखंडी रॉडला आपटलं..इतकचं काय तर आरोपीनं मुलाला फरफटत नेत, त्याला जोरात हवेत भिरकावत आपटलं.
विशेष म्हणजे, कपडे धोपटावे तसं मुलाला जमिनीवर जोरात आपटताना आणि मुलाच्या जीवाशी खेळताना या नराधमाला जरासुध्दा दया आली नाही. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या प्रतिनिधीनं पीडित मुलाच्या कुटुंबियांना गाठलं.
क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या आरोपी रिक्षाचालकाचा राग इतका अनावर झाला होता की त्यानं चिमुकल्याचा थेट जीवे मारण्याचाच प्रत्यन केला... दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
मात्र या घटनेनंतर किरकोळ वादातून लहान मुलांवर होणाऱ्या अशा जीवघेण्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय... बदल्याची आग थेट चिमुरड्याचा जीव घेण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर माणुसकी नेमकी कुठे हरवली. या घटनेनंतर मी बदला घेतला, असं निर्लज्जपणे सांगणारा तो नराधम किती विकृत असेल... याचा विचार न केलेलाच बरा..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.