Supriya Sule : सर्व आनंद हिरावून घेतला ताई, आता काय उपयोग…; निकालानंतर वैभवी देशमुखला सुप्रिया सुळेंचा फोन, म्हणाल्या...

Supriya Sule Call to Vaibhavi Deshmukh : बारावीचा निकाल लागल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी खूपच भावूक झाली होती. त्याचदरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वैभवी देशमुखला कॉल करत शुभेच्छा दिल्या आहेत.
12th result Supriya Sule calls Vaibhavi Deshmukh
12th result Supriya Sule calls Vaibhavi DeshmukhSaam Tv News
Published On

सचिन जाधव, साम टिव्ही

पुणे : बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी बारावी पास झाली आहे. वैभवी देशमुखला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने चिकाटीने अभ्यास करत बारावीची परीक्षा दिली आणि तिला यात चांगलं यश मिळालं. बारावीचा निकाल लागल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी खूपच भावूक झाली होती. त्याचदरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वैभवी देशमुखला फोन करत अभिनंदन केलंय.

सुप्रिया सुळे अन् वैभवीमध्ये काय संभाषण झालं?

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मॅडम पेढे कुठेयत? तुझं खूप खूप अभिनंदन', त्यावर वैभवी म्हणाली, 'सगळा आनंद चालला गेला ताई', त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'खरंच लेका मला तेच वाटत होतं की, तू काय संघर्ष केलाय, आणि तुला एवढे मार्क्स पडले, खरंच तुझं किती कौतुक केलं तरी कमीय. मला तुझा खूप खूप सार्थ अभिमान आहे. दरम्यान, असं संभाषण दोघांमध्ये झालं.

12th result Supriya Sule calls Vaibhavi Deshmukh
Sangli Crime : पोटच्या लेकाचा आगीत होरपळून मृत्यू; नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर

वैभवी देशमुख काय म्हणाली?

वैभवी देशमुखने सांगितलं की, 'मला ८५.३३ टक्के मार्क्स मिळाले आहेत. पण आज मला खरंच एवढे मार्क्स मिळाले याचा मला काहीच आनंद वाटत नाही. कारण आमचा आनंद यांनी हिरावून घेतला. माझ्या वडिलांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. एवढ्या मार्क्सची अपेक्षा नव्हती. पण महाराष्ट्राच्या साथीने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या पाठीशी आहे म्हणून आज हे सर्व मार्क्स त्यांच्यामुळेच आहेत.'

वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीनं परीक्षेची तयार करून परीक्षा दिली. त्याबद्दल तिने सांगितलं की,'तो काळ खूपच कठीण होता. आज आम्ही विचार देखील करू शकत नाही. ते दु:खाचे डोंगर याआधी आम्ही कधीच अनुभवले नाही आणि आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण कुणाचीही मानसिकता नव्हती तरी देखील सर्वांना वाटतं की मी माझ्या करिअरमुळे परीक्षा द्यावी. म्हणून मी परीक्षा दिली. सर्वांच्या साथीने आणि वडिलांच्या आशीर्वादाने निकाल चांगला लागला.'

12th result Supriya Sule calls Vaibhavi Deshmukh
12th HSC RESULT: 'आज सगळे सोबत, पण कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत', निकालानंतर संतोष देशमुखांची मुलगी रडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com