उल्हासनगर : रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असाच प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला असून यात एका रिक्षा चालकाची फसवणूक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांचे पाच लाख रुपये करून देतो; असे सांगून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी ठगवणाऱ्या ५ जणांना तांत्रिक तपासाच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे.
कल्याणच्या बेतुरकर पाडा भागात राहणाऱ्या रिक्षा चालक योगेश चव्हाण यांना त्यांचा मित्र गोलू याने पाचपट पैसे करून देणाऱ्या मित्रांशी ओळख करून दिली. यानंतर उल्हासनगर कॅम्प ४ मधील सीएनजी पंपाजवळ काही दिवसांपूर्वी बोलावले होते. तिथे आलेल्या दोन जणांनी योगेश यांचे १ लाख रुपये घेतले. लागलीच तेथे आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचा बनाव करत दमदाटी करण्यास सुरवात केली.
दोघांना पकडून नेत केला बनाव
तर रक्कम घेणार्यांना तुम्ही दोघे इकडे वॉन्टेडमध्ये फिरता का? असं म्हणत १ लाख रूपयांची पिशवी घेऊन त्यांना पकडून नेल्याचा बनाव केला. मात्र रिक्षा चालक योगेश हे अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी योगेश यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली. यानंतर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पाच जणांना घेतले ताब्यात
तर सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात पाच जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांना लक्षात आले. यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने सापळा रचून गोलू उर्फ नरेश गायकवाड, गणेश दुर्गे, प्रशांत शेट्ये, वीरेंद्र वाल्मिकी आणि गौतम सोनी यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून १३ हजार ५०० रुपये हस्तगत केले असून या ठगांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.