Ulhasnagar Fire : उल्हासनगरमध्ये खळबळ! इमारतीला भीषण आग; अनेक रहिवासी अडकले

Ulhasnagar Building Fire : उल्हासनगरच्या आशालोक इमारतीत मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. अनेक रहिवासी फ्लॅटमध्ये अडकले असून १० हून अधिक वाहने जळून खाक झाली.
ULHASNAGAR FIRE: MASSIVE BLAZE IN ASHALOK BUILDING AFTER METER BOX SHORT CIRCUIT, RESIDENTS TRAPPED
ULHASNAGAR FIRE: MASSIVE BLAZE IN ASHALOK BUILDING AFTER METER BOX SHORT CIRCUIT, RESIDENTS TRAPPED
Published On
Summary
  • आशालोक इमारतीत मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.

  • आगीने काही क्षणांतच दुसरा आणि तिसरा मजला व्यापला, अनेक रहिवासी फ्लॅटमध्ये अडकले.

  • या दुर्घटनेत १० हून अधिक वाहने जळून खाक झाली

उल्हासनगरमधील वीनस चौक परिसरातील आशालोक इमारतीत मंगळवारी मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत धडक दिली. या दुर्घटनेत १० हून अधिक वाहने जळून खाक झाली.

ULHASNAGAR FIRE: MASSIVE BLAZE IN ASHALOK BUILDING AFTER METER BOX SHORT CIRCUIT, RESIDENTS TRAPPED
Train Fire : स्टेशनवर ट्रेन पोहोचताच इंजिनला भीषण आग, डब्यांमध्ये पसरला धूर; प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या

आगीमुळे संपूर्ण इमारतीत दाट धूर पसरल्याने अनेक रहिवासी आपल्या फ्लॅटमध्ये अडकून पडले. धुरामुळे गुदमरल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या अनेक रहिवाशांची सुरक्षित सुटका केली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

ULHASNAGAR FIRE: MASSIVE BLAZE IN ASHALOK BUILDING AFTER METER BOX SHORT CIRCUIT, RESIDENTS TRAPPED
Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

आशालोक इमारतीत एकूण ४९ फ्लॅट आहेत. आगीच्या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून त्यामुळे रहिवाशांना अंधारात राहावे लागत आहे. लवकरात लवकर तात्पुरता वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील प्रशासनाकडून तपासला जात असून पुढील चौकशी सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com