शाही मशिदीवरून वाद पेटला; पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या

Ujjain Shahi Masjid Stone Pelting And Tear Gas Latest News: उज्जैनच्या अब्दालपुरा परिसरातील शाही मशिदीच्या प्रभावित भागावरून वाद वाढला. रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईला विरोध करताना दगडफेक झाली असून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर केला.
UJJAIN SHAHI MASJID ROW
UJJAIN SHAHI MASJID ROWsaam tv
Published On: 

उज्जैनच्या अब्दालपुरा परिसरातील शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईला जोरदार विरोध होत असतानाच मुस्लिम समाजातच दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. एका गटाकडून मशिदीचा संबंधित भाग स्वतःहून हटवण्याची तयारी दर्शवली जात आहे, तर दुसरा गट कारवाईला विरोध करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शाही मशीद पाडली जाणार असल्याच्या चर्चेनंतर स्थानिक नागरिक आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मशिदीबाहेर जमून आंदोलन करत आहेत.

UJJAIN SHAHI MASJID ROW
Elections : विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय घडामोडींना वेग; भाजपसह ३ प्रमुख पक्षांनी आधीच डाव टाकला

रविवारी रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तासह जेसीबी आणि पोकलँड मशीन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात सुमारे 2 हजार पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच मशिदीच्या 500 मीटर परिसरात बॅरिकेडिंग करून वाहतूक आणि नागरिकांची ये-जा रोखण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.

UJJAIN SHAHI MASJID ROW
मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात शांत झाली. मात्र, सोमवारच्या दिवशीही परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू राहिले. यावेळी संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

UJJAIN SHAHI MASJID ROW
गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कंठाल चौक ते गोपाल मंदिर या सुमारे 900 मीटर लांबीच्या रस्त्याचे 15 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणाच्या मार्गात एकूण सात धार्मिक स्थळे येत होती. त्यापैकी बहुतांश धार्मिक स्थळे सर्वांच्या सहमतीने हटवण्यात आली आहेत. मात्र, खडे हनुमान मंदिरापासून गोपाल मंदिरापर्यंतच्या भागात असलेली एक मस्जिद, खडे हनुमान मंदिर आणि शाही मशीद यांच्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com