Kolhapur APMC Election : कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीच्या राजकारणात ठाकरेंची शिवसेना काेमात, काॅंग्रेसह एनसीपी जाेमात

उद्या अर्ज मागे घेण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे.
Kolhapur, kolhapur market committee election
Kolhapur, kolhapur market committee electionsaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत (kolhapur market committee election) महाविकास आघाडीत (mva) बिघाडी झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला (uddhav thackeray faction) काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या (गुरुवार) या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटची दिवशी काेणत राजकारण घडतयं हे पाहायला लागणार आहे. (Maharashtra News)

Kolhapur, kolhapur market committee election
Kabbadi च्या वादातून अख्खं गाव एकवटलं; 24 तासांत हल्लेखाेरास अटक करा, अन्यथा सगळ्या बायका मिळून घरात घुसू.., पाेलिसांना दिलं आव्हान

राज्यात बाजार समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बुहतांश जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुका बिनविराेध व्हाव्यात यासाठी विविध राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. काेल्हापूरात देखील ही निवडणुक बिनविराेध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. रविवारी त्यासाठी विविध राजकीय पक्षातील नेत्यांची एक बैठक झाली. परंतु इच्छुकांनी संख्या जादा असल्याने सध्या तरी निवडणुक अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Kolhapur, kolhapur market committee election
Hingoli News : काम बंद करून गाड्या जाळून टाकु... CM शिंदेंच्या आमदाराचा Video Viral

कोल्हापूर बाजार समितीत महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गटाला डावल्याचा आरोप केला जात आहे. या गटास बाजार समितीत केवळ एकचं जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

दरम्यान यामुळे सेना गट आक्रमक झाला आहे. उद्या सकाळ पर्यंत निर्णय घेतला नाही तर वेगळे पॅनल उभं करण्याचा मानस ठाकरे गटाने बाेलू दाखविला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सेनेला विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला गेला आहे.

Kolhapur, kolhapur market committee election
Maharashtra Politics : सांगा कूठे यायचं ! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पलटवार, नितेश राणेंना दिलं आव्हान (पाहा व्हिडिओ)

दरम्यान आज संध्याकाळ पर्यंत निर्णय न झाल्यास उद्या स्वतंत्र पॅनेल तयार करू असा इशारा निमंत्रक सुनील मोदी यांनी मविआच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे. त्यामुळे 18 जागांसाठी हाेणा-या या निवडणुकीसाठी सेनेला किती जागा मिळणार हे उद्यापर्यंत स्पष्ट हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com