Kabbadi च्या वादातून अख्खं गाव एकवटलं; 24 तासांत हल्लेखाेरास अटक करा, अन्यथा सगळ्या बायका मिळून घरात घुसू.., पाेलिसांना दिलं आव्हान

पाेलिसांच्या आश्वासनानंतर जमाव शांत झाला.
Ratnagiri, Kabbadi News, sakharpa
Ratnagiri, Kabbadi News, sakharpasaam tv
Published On

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा (sakharpa) इथं कबड्डीच्या खेळावरून झालेल्या वादात एका युवकावर तलवार हल्ला झाला. त्याचे पडसाद आज (बुधवार) साखरपा गावात उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी महिलांनी एकत्र येत पाेलिस ठाण्याचे अधिका-यांना तपासात प्रगती का नसल्याची विचारणा केली आहे. (Maharashtra News)

Ratnagiri, Kabbadi News, sakharpa
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बावड्यातील शेतकरीच बंटी पाटलांना त्यांची जागा दाखवतील : खासदार धनंजय महाडिक

साखरपा पंचक्रोशीतील 25 गाव एकत्र येत त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. साखरपा गावातील बाजारपेठ आज पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. संशयित आरोपीला त्वरित अटक करावी या मागणीसाठी साखरपा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी थेट साखरपा पोलीस स्टेशन गाठलं.

Ratnagiri, Kabbadi News, sakharpa
Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा मृत्यू

या घटनेतील आरोपींवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी शेकडो ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केला जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com