nitesh rane, sangram jagtap
nitesh rane, sangram jagtapsaam tv

Maharashtra Politics : सांगा कूठे यायचं ! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पलटवार, नितेश राणेंना दिलं आव्हान (पाहा व्हिडिओ)

नजरेला नजर मिळू शकत नाही अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली होती.

- सुशिल थोरात

Mla Sangram Jagtap News : ज्यांची उंची माझ्या शर्टच्या पहिल्या बटनापर्यंत असल्याने माझी आणि त्यांची नजरा नजर होऊ शकत नाही हे जरी खरं असले तरी तुम्ही सांगा कुठे यायचे, कुठल्या ठिकाणी यायचं तेथे निश्चित आम्ही येऊ असं प्रत्युत्तर आणि आव्हान आमदार संग्राम जगताप (mla sangram jagtap) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना दिलं आहे. (Maharashtra News)

nitesh rane, sangram jagtap
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बंटी पाटील, बिंदू चौकात या ! अमल महाडिकांचं Open Challenge

भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनगर (nagar) शहरात कापड बाजार हल्ल्यातील व्यपाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले हाेत. त्यावेळी मुख्य बाजार पेठेत छोटेखानी झालेल्या सभेत अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. संरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो नगरचा आमदार तुमचं संरक्षण करू शकत नाही तो माझ्यासमोर उभा राहू शकत नाही. नजरेला नजर मिळू शकत नाही अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली होती.

nitesh rane, sangram jagtap
Pimpri Chinchwad News : होर्डिंग अपघात प्रकरणी जमीन मालकास अटक, संशयितांचा शाेध सुरु

या टीकेला अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिउत्तर दिले आहे. नितेश राणे यांची उंची माझ्या शर्टच्या पहिल्या बटनापर्यंत असल्यामुळे माझी आणि त्यांची नजरा नजर होऊ शकत नाही आणि नजरेला नजर हवीच असेल तर तुम्ही सांगा कुठे यायचे, कुठल्या ठिकाणी यायचं निश्चित आम्ही त्या ठिकाणी येऊ असं आव्हान आमदार संग्राम जगताप यांनी राणेंना दिलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com