Pimpri Chinchwad Hoarding Collpase: होर्डिंग अपघात प्रकरणी जमीन मालकास अटक, संशयितांचा शाेध सुरु

Pimpri Chinchwad Hoarding Collpase Case: या घटनेचा रावेत पाेलिस कसून तपास करीत आहेत.
pimpri chinchwad news, ravet, hoarding collpase
pimpri chinchwad news, ravet, hoarding collpaseSaam Tv

Pune News : पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात सोमवारी होर्डिंग कोसळून (Pimpri Chinchwad Hoarding Collapse) ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी रावेत पोलिसांनी (Ravet Police) यांनी जमीन मालक नामदेव बारकू म्हसुडगे याला अटक केली आहे. या घटनेतील अन्य संशयितांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

pimpri chinchwad news, ravet, hoarding collpase
Bhor Ghat News : आता बाेरघाटातून हाेणार सुरक्षित प्रवास; CM शिंदेंचा एक निर्देश आणि सर्व सूत्रे तात्काळ हलली

सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बंगळुरू- मुंबई हायवे शेजारी असलेल्या स्वामी हॉटेलजवळ एक मोठे अनधिकृत होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. रावेत पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

pimpri chinchwad news, ravet, hoarding collpase
Kolhapur News : मनसे कार्यकर्ते आक्रमक हाेत थेट घुसले जिल्हाधिकारी कार्यालयात, उपजिल्हाधिका-यांच्या दालनात घातला राडा

या प्रकरणात पोलिसांनी जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे यास अटक केली आहे. तसेच होर्डिंग तयार करणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयितांचा शाेध घेण्यासाठी रावेत पोलिसांनी चार पोलिसांची पथकं तयार केली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com