
- सचिन कदम
Bhor Ghat News : मुंबई पुणे महामार्गावर (mumbai pune highway) ब्लॅकस्पॉट बनलेल्या बोर घाटात शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर महामार्ग विभागाने या ठिकाणी संरक्षण कठडे उभारले आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण कमी हाेईल अशी आशा आहे.(Maharashtra News)
बोरघाटात अंडा पॉइंट, शिंग्रोबा मंदीराच्या वरच्या खिंडीपासून ते टाटा कॉलनी, सायमाळपर्यंत उतारावर अनेकदा बस, अवजड वाहने, रिक्षा पलटी होऊन अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. गेली अनेक वर्ष शेकडो अपघातांनंतर फक्त सुरक्षेच्या कारणांवर चर्चा होत हाेती. मात्र, त्यावर योग्य त्या उपाययोजनांसाठी कुठल्याही प्रकारची पावले उचलली गेली नव्हती.
बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ नुकताच झालेल्या भीषण अपघातात सुमारे 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच 25 ते 30 प्रवासी जखमी झाले. त्यावेळी राजगड महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले (sp tanaji chikhale) तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली हाेती. त्यावेळी स्थानिकांनी या ठिकाणी सातत्याने अपघात हाेत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी येथे कायमस्वरूपी बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार रविवारी सकाळी बैठक होऊन मुंबई पुणे महामार्गावरील बोर घाटातील अपघात स्थळी संरक्षक कठडे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पुर्णत्वास आल्यानंतर येथील अपघात कमी हाेतील अशी आशा आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.