ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार गेले कुठे? ठावठिकाणा लागला; शहराचे नाव आले समोर

Thackeray 6 Rebel Mps Location Jaipur Shinde Join: ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदारांचा ठावठिकाणा लागला असून ते जयपूरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हे खासदार मुंबईत येऊन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Rebel MPs from Uddhav Thackeray faction reportedly moved from Delhi to Jaipur ahead of their likely entry into Shinde Sena in Mumbai.
Rebel MPs from Uddhav Thackeray faction reportedly moved from Delhi to Jaipur ahead of their likely entry into Shinde Sena in Mumbai.saam tv
Published On

राज्याच्या राजकारणातील ऑपरेशन टायगर हे आता अंतिम टप्प्यात पोहचले असून उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मागच्या 2 दिवसांपासून ठाकरेसेनेचे 6 खासदार हे नॉट रिचेबल असून ते शिंदेसेनेत विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकारणात सुरू होत्या. मात्र हे सर्व खासदार नेमके कुठेय हा प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. आता याबाबत सूत्रांनी मोठी अपडेट दिली आहे.

Rebel MPs from Uddhav Thackeray faction reportedly moved from Delhi to Jaipur ahead of their likely entry into Shinde Sena in Mumbai.
Operation Tiger: ठाकरेंच्या ६ खासदारांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश केला, शिंदेंच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हे सर्व खासदार दिल्लीतील लीला हॉटेलमधून थेट राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आले आहे. तसेच आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेसवेला लागून असलेल्या प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलमध्ये या सर्व खासदारांची मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. उद्या 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन जोरदार स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा नेस्को सेंटरचा कार्यक्रम आणि वेस्टीन हॉटेल अगदी शेजारी शेजारी असल्यामुळेच सुरक्षेच्या आणि जवळ असल्याच्या कारणास्तव सर्व खासदारांना आज संध्याकाळी 6 वाजेनंतर गोरेगावमध्ये आणले जाईल. या सर्व बंडखोर खासदारांसाठी वेस्टीन हॉटेलमध्ये आधीच रूम बुक् करण्यात आल्या आहेत आणि आज रात्री ते याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत.

Rebel MPs from Uddhav Thackeray faction reportedly moved from Delhi to Jaipur ahead of their likely entry into Shinde Sena in Mumbai.
Operation Tiger: ठाकरेंचे 6 खासदार अपात्र ठरणार का? डॉ.अनंत कळसेंनी काय सांगितलं?

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भव्य पक्षप्रवेश

शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी केला असून दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र 9 पैकी 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या 30 मिनिटांच्या कॉन्फरन्स कॉलनंतर या खासदारांचे मनपरिवर्तन रोखण्यासाठी त्यांना जयपूरला पाठवण्यात आले होते. आता हे सर्व 6 खासदार उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीरपणे एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या गटाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com