
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीने प्रत्येकाच्या काळजात धडकी भरली. सोमवारी महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकलेला HMPV विषाणूने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. चीनमध्ये उदय झालेल्या HMPV विषाणूमुळे काही देशातील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. भारतातही या विषाणूने एन्ट्री केली आहे. भारतात आतापर्यंत ८ ते १० रूग्ण आढळले आहेत. नागपूरमध्ये HMPV या विषाणूचे दोन संशयीत रूग्ण आढळले आहे. राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.
नागपुरातही एचएमपीव्ही चे 2 रुग्ण संशयित आढळले आहेत. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णलायांतून सांगितलं जातं आहे. यामध्ये सात वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत. पण जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल, असे समोर आलेय.HMPV
या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याचीही माहिती. खाजगी रुग्णालयातून हे रिपोर्ट घेण्यात आले आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात शासकीय लॅबमधून याची जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल. त्यानंतरच हे रुग्ण HMPV असल्याचं स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
नागपूर कोर्टात याचिका ? कोरोनासारखी स्थिती होऊ नये, म्हणून याचिका
'एचएमपीव्ही' आजारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाय योजना काय? असे म्हणत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एडवोकेट श्रीरंग भांडारकर यांनी अर्ज दाखल केला आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या वेळी सज्ज नव्हती, परिणामी सर्वत्र हाहाकार माजला होता, हजारो नागरिकांचा करुणामुळे मृत्यू झाला होता, असेही त्यात म्हटलेय.
कोरोनासारखीच परिस्थिती एचएमपीव्हीच्या बाबतीत ओढवू नये. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला विविध निर्देश देण्याची मागणी या अर्जाद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आजारावर सूक्ष्म नजर ठेवण्यात यावी. एचएमपीव्ही चाचण्या वाढविण्यात याव्या, नियमित जनजागृती अभियान राबवावे.
उपचारासाठी आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी, एचएमपीव्ही विषाणूचा सखोल अभ्यास करण्यात यावा, विषाणू प्रतिबंधक प्लस विकसित करावी, विविध स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. या अर्जावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.