
अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरलीये. चीनच्या HMPV व्हायरसने अखेर भारतात शिरकाव केलाय. एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय. कारण महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात दोन रुग्ण आढळले आहेत. एक वर्षही पूर्ण न झालेल्या दोन चिमुरड्यांना HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
बंगळुरुच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPV चा व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, मात्र तरीही त्यांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.
सध्या चीनमध्ये HMPV व्हायरस धुमाकूळ घालत असून भारतात देखील याचे दोन रूग्ण सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये या व्हायरसबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान या व्हायरसबाबत पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिलीये. HMPV विषाणू घातक नाही, सर्दी खोकल्यासारखा श्वसन संस्थेचा आजार आहे, असं त्यांनी म्हटलंय.
डॉ. भोंडवे यांच्या म्हणण्यानुसार, नाक गळणं,घसा दुखणं ही त्याची लक्षणं असली तरीही हा व्हायरस कोरोना सारखा आजार नाही. हा व्हायरस वेगाने पसरत आहे. मात्र लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना धोका आहे. 2001 पासून व्हायरसची माहिती आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. दरम्यान खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.