HMPV Virus: भारताचं टेन्शन वाढलं; HMPV पहिल्यांदा कुठून आला, खबरदारीसाठी काय करावं, काय करू नये?

HMPV Virus: जर या व्हायरसची देखील कोरोनासारथी परिस्थिती राहिली आणि हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरला तर जगाला पाच वर्षांत आणखी एका महामारीचा सामना करावा लागू शकतो.
origin of hmpv virus
origin of hmpv virussaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV Virus धुमाकूळ घालतोय. दरम्यान भारतात देखील याचे २ चिमुकले रूग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाच्या विळख्यात सापडणार का हा प्रश्न सर्वांसमोर आले . मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिकडच्या काळात चीनमध्येही अशीच परिस्थिती दिसली आहे. रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटल आणि स्मशानभूमीत मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं.

जर या व्हायरसची देखील कोरोनासारथी परिस्थिती राहिली आणि हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरला तर जगाला पाच वर्षांत आणखी एका महामारीचा सामना करावा लागू शकतो. HMPV मुळे होणारी गुंतागुंत कोरोनाव्हायरस सारखीच आहे, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

origin of hmpv virus
चीनचा HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर, ३ महिन्यांची चिमुरडी पॉझिटिव्ह; तो किती जीवघेणा, डॉक्टर काय म्हणाले?

नवा नाही हा व्हायरस

चीनमध्ये संसर्ग वाढल्यापासून हा व्हायरस फार चर्चेत आहे. 2001 मध्ये याची प्रथम ओळख झाली. जगभरात या संसर्गजन्य प्रकरणं वेळोवेळी नोंदवण्यात आली आहेत. या व्हायरसची ओळख पटल्यानंतर दोन दशकांनंतरही यावर लस विकसित केली गेली नाहीये. शिवाय यावर कोणताही विशिष्ट उपचार नाहीये. एचएमपीव्हीची कोणतीही लस नसल्यामुळे आता मात्र हा जागतिक स्तरावर हा श्वसनाच्या गंभीर आजाराचं कारण बनू शकतो.

origin of hmpv virus
HMPV outbreak: चीननंतर आता 'या' देशात HMPV व्हायरसने घातलं थैमान; रूग्णालयात लांब रांगा, आरोग्य मंत्रालयाकडून इशारा

तज्ज्ञांनी केलं मोठं संशोधन

चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, डच शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं असून HMPV हा मेटापन्यूमोव्हायरस वंशाशी संबंधित आहे. हे प्रथम डच शास्त्रज्ञांनी शोधून काढलं होतं. यावेळी तज्ज्ञांनी श्वासोच्छवासाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या नासोफरींजियल ऍस्पिरेट्समध्ये याला ओळखलं होतं.

2018 मध्ये या व्हायरसच्या संसर्गाने अंदाजे 11,300 लोकांचा मृत्यू झाला. क्लीव्हलँड क्लिनिकने अहवाल दिला आहे की, संसर्गाने पीडित लोकांवर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. या संसर्गाची लक्षणं आत्तापर्यंत आयव्ही आणि कॉर्टिकोस्टेरॉईड्स यांसारख्या सहाय्यक थेरपीने दूर करण्यात आली आहेत.

origin of hmpv virus
HMPV First Case in India: मोठी बातमी! चीनमधील विषाणू भारतात दाखल? HMPV चा पहिला रूग्ण बंगळुरूत आढळला

व्हायरसचा धोका टाळण्यासाठी हे करा

  • जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

  • साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

या गोष्टी करू नका

  • हस्तांदोलन

  • टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर

  • आजारी लोकांशी जवळचा संपर्क

  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं.

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणं

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणं.

origin of hmpv virus
HMPV outbreak: जगात पुन्हा लागणार लॉकडाऊन? कोरोनाच्या ५ वर्षांनंतर पुन्हा पसरतोय रहस्यमयी व्हायरस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com