Uddhav Thackeray News : 'पंढरीऐवजी ओवेसींची गळाभेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हैद्राबादची वारी करतील'

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे तुषार भाेसलेंनी स्पष्ट केले.
tushar bhosale , uddhav thackeray, shivsena, pandharpur
tushar bhosale , uddhav thackeray, shivsena, pandharpursaam tv

Uddhav Thackeray News : उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) शिल्लक शिवसेना‌ (shivsena) वाचवण्यासाठी पंढरीच्या वारी‌ ऐवजी ओवेसींची गळाभेट घेण्यासाठी हैद्राबादची वारी करतील असा टोला भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी आज (गुरुवार) पंढरपुरात (Pandharpur) बोलताना लगावला. भाेसले हे पंढरपूरात आले हाेते. त्यावेळी ते माध्यमांशी बाेलत हाेते. (Tushar Bhosale Latest Marathi News)

भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांना उध्दव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणार आहेत अशी‌ चर्चा सुरू झाली आहे, यावर आपले मत काय असे विचारले असता त्यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडेच आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिल्लक गट आहे. ताे गट अनेक विषारी लोकांबरोबर युती करण्याचा प्रयत्न करीत आहे. (Maharashtra News)

tushar bhosale , uddhav thackeray, shivsena, pandharpur
Sachin Tendulkar News : अस्सल कोल्हापुरीनं सचिन तेंडुलकरचा पाहुणचार; तेज घाटगे लिहितात, आमच्यासाठी...

भाेसले म्हणाले बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी काय चर्चा झाली याची माहिती नाही पण उद्धव ठाकरे हे आता पंढरी ऐवजी ओवेसींची गळाभेट घेण्यासाठी हैद्राबादची वारी करतील हे मात्र निश्चित असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लव्ह जिहादसाठी पोषक वातावरण तयार झाले होते.‌ त्यामुळे राज्यात काही ठिकाणी घटना घडत असल्याचे भाेसले यांनी नमूद केले.

tushar bhosale , uddhav thackeray, shivsena, pandharpur
Maya Tigress Video : सुप्रिया सुळे आनंदित; बछड्यासह दिसली सेलिब्रिटी वाघीण ‘माया’ (पाहा व्हिडिओ)

दरम्यान यापुढे अशा घटना महाराष्ट्रात घडणार नाहीत असा दावा तुषार भोसले यांनी पंढरपूरात केला. दरम्यान संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारास टिकली लाव असे म्हटले त्यावर भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे भाेसलेंनी स्पष्ट केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

tushar bhosale , uddhav thackeray, shivsena, pandharpur
Tahsildar Office : तहसील कार्यालयातील चाेरीची दबक्या आवाजात चर्चा; अधिका-यांच्या भूमिकेकडे लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com