
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आपले नाव येईल या भीतीने अनेक जण फरार झाले आहेत. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहेत. फरार झालेल्या २१ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीने तुळजापुरातून जवळपास १०० लोकं गायब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तुळजापुरात १५ ते २० पेडलरच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
तुळजापुरातील काही खास हॉटेलमधून या ड्रग्जची विक्री व्हायची असे देखील सांगितले जात आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणातील ३५ आरोपींपैकी १४ आरोपी अटकेत आहेत तर अजूनही २१ आरोपी फरार आहेत.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. तुळजाभवानी मंदिराच्या १३ पुजाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. तर, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदेंनी दिली. तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे. इथे अनेक पुजारी आहेत. सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, असं देखील विपीन शिंदे यांनी सांगितले होते.
दरम्यान, तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या तीन आरोपींना ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. या ड्रग्ज तस्करांकडून पोलिसांनी ४५ ग्रॅम ड्रग्ज असलेल्या ५९ पुड्या जप्त केल्या होत्या. या सर्व आरोपींना १४ फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासला गती मिळाली. आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.