Mumbai: "ड्रग्ज घेतल्याशिवाय राहवत नाही" महिलांची मुंबईच्या रिक्षात ड्रग्ज पाट्री, २०० रूपये दर आणि..

Auto Rickshaw Drug Party Video: मालाडमधील मालवणी परिसरात दोन महिलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे मुंबईतील वाढत्या ड्रग्स समस्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
MAlad
MAladSaam
Published On

मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालाडमधील मालणी परिसरात दोन महिलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांशी संवाद साधत आहेत. त्या महिला "आम्हाला ड्रग्जचं व्यसन लागलं आहे. ड्रग्ज घेतल्याशिवाय राहवत नाही", असं म्हणत आहेत. सध्या महिलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, मुंबईतील वाढत्या ड्रग्ज समस्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

रिक्षात महिलांची ड्रग्ज पार्टी

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक रिक्षा दिसत आहे. रिक्षात २ महिला आहेत. त्या ड्रग्जचे सेवन करताना दिसत आहे. त्यांचे व्हिडिओ शूट करणारा पुरूष आहे. ड्रग्जमुळे आयुष्य आणि आरोग्य कसे खराब होते, यावर तो सल्ला देत असताना व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. त्या महिला देखील त्या पुरूषासोबत संवाद साधत आहे.

MAlad
Shocking: फ्लॅटमध्ये कपलकडून नको तसले व्हिडिओ शूट, ३-४ तासांत पॅकअप; शेजाऱ्यांसमोर मॉडेल्स यायच्या पण...

"आम्हाला आता ड्रग्जचं खूप व्यसन लागलं आहे. ड्रग्ज घेतल्याशिवाय आता राहवत नाही", असं त्या महिला त्या पुरूषाला म्हणत आहेत. मग तो पुरूष महिलांना, "हे ड्रग्ज तुम्हाला कुठे सापडले? ड्रग्ज किती दराने तुम्ही विकत घेतले?", असे प्रश्न विचारत आहे. त्यावर महिला २ पाऊचसाठी २०० रुपयांचा दर आहे, असं सांगताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

MAlad
Maharashtra Politics: शहाजी बापूंना "ती" चूक कळाली, भरसभेत स्वत:च्या थोबाडीत मारून घेतलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @aasif_o या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. "वडा पाव घेण्यापेक्षा ड्रग्स विकणे आणि सेवन करणे सोपे झाले आहे. मुंबईत वडा पावची किंमत आणि ड्रग्जची जवळजवळ सारखीच आहे. तुम्ही कशाची निवड कराल?" असे कॅप्शन व्हिडीओला देण्यात आले आहे. तसेच कॅप्शनमध्ये “मालवणी गेट क्रमांक ०६” हे स्थानही नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com