Drugs Case: लातूरचा होतोय उडता पंजाब; पोलीस हवालदार की ड्रग्सचा सरदार

Police Constable Drug Mafia : तुळजापूरनंतर लातूरमधील ड्रग्स रॅकेट उघडकीस आलंय. लातूरमधील एक शेतात ड्रग्स बनवण्याची फॅक्टरीच सुरू असल्याची बाब समोर आलीय.
Latur Drugs Case
Police Constable Drug Mafia saam tv
Published On

मुंबईचा हवालदार ड्रग्सचा सरदार बनलाय. होय मुंबईत कायद्याचा रक्षक असणारा हा हवालदार गावात कायद्याच भक्षक बनून राज्याला ड्रग्सच्या नशेत डुबवण्याचं काम करत होता. या खाकीतील ड्रग्स माफियानं पोलीस खात्यावर काळं फासण्याचं काम केलंय. पाहुया.

महाराष्ट्राला लागलेलं ड्रग्जचं ग्रहण काही केल्या कमी होत नाही. पुणे मुंबईनंतर आता ग्रामीण भागही ड्रग्सच्या विळख्यात अडकलाय तुळजापूरात देवीच्या पुजारीच ड्रग्ज् विकत असल्याचं समोर आलं असताना शेजारच्याच लातुरात ड्रग्जचा कारखानाच सापडला आणि हा कारखाना होता मुंबईच्या पोलिसाचा. मुंबईत काम करत असतानाच या पोलिसानं थेट आपल्या गावातच ड्रग्सचा कारखाना सुरु केला.

Latur Drugs Case
Tuljapur Drugs Case: तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राजकीय कनेक्शन, VIDEO

लातुरात पोलिसांचा ड्रग्जचा कारखाना

लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिना गावात थाटला होता कारखाना

आरोपी प्रमोद केंद्रे मुंबईत पोलीस हवालदार

स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बनवत होता ड्रग्ज

लातुरात ड्रग्ज बनवून मुंबई पुण्यात करायचा विक्री

Latur Drugs Case
Mumbai: "ड्रग्ज घेतल्याशिवाय राहवत नाही" महिलांची मुंबईच्या रिक्षात ड्रग्ज पाट्री, २०० रूपये दर आणि..

डीआरआय अधिकाऱ्यांना या कारखान्याचा सुगावा लागला आणि त्यांनी इथे धाड टाकून कारवाई केली. या छापेमारीत 11 किलो 66 ग्रॅम मेफेड्रोन हे 17 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून पोलीस हवालदार प्रमोद केंद्रेसोबत 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबईचा हा हवालदार आठवड्यातून २ दिवस त्याच्या ब्रिझा गाडीने सतत गावी चक्कर मारायचा आणि येताना हे ड्रग्सचं सामान आणायचा. पोलिसाच्या वर्दीआडून त्याचे हे काळे धंदे सरार्सपणे सुरू होते. मोठी शहरच नव्हे तर आता छोटी गावंही ड्रग्जच्या धुरात हरवत चालली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com