Tulajapur Drug Case: मोठी बातमी! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा सहभाग; १३ जणांची नावं समोर

Tulja Bhavani Temple: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. १३ पुजाऱ्यांची नावं देखील समोर आली आहेत.
Tulja Bhavani Temple
Tulja Bhavani TempleSaam Tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वच्या सर्व १३ पुजाऱ्यांची नावं देखील समोर आली आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपी आहेत. यामधील २१ आरोपी फरार आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदेंनी ही माहिती दिली. तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे. इथे अनेक पुजारी आहेत. सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, असं देखील विपीन शिंदे यांनी सांगितले.

Tulja Bhavani Temple
Dharashiv: प्रायव्हेट फोटो अन् ब्लॅकमेल, कळंब हत्या प्रकरणातील महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि..

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची नावे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील १३ पुजारी सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजा यांनी पोलिसांनाकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.

Tulja Bhavani Temple
Dharashiv : मार्च अखेरीस केवळ ३४ टक्के पाणीसाठा; धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पातील स्थिती

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा. तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचे पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी सांगितले. दरम्यान ३ वर्षांपासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी आहे.

Tulja Bhavani Temple
Dharashiv News : महाराज तुम्हीच न्याय द्या; शिवरायांची जयंती साजरी केल्याने शेख कुटुंबाला मारहाण; धाराशिवमध्ये नक्की काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com