Dharashiv : मार्च अखेरीस केवळ ३४ टक्के पाणीसाठा; धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पातील स्थिती

Dharashiv News : पिकांना देखील अधिक पाणी लागत असल्याने पाणी उपसा वाढला आहे. तर बाष्पीभवनामुळे देखील प्रकल्पातील पाणी साठा देखील कमी होत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पात एकुण ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : मार्च महिन्यातच राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात आता धाराशिव जिल्ह्यात देखील उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पिकांना देखील अधिक पाणी लागत असल्याने पाणी उपसा वाढला आहे. तर बाष्पीभवनामुळे देखील प्रकल्पातील पाणी साठा देखील कमी होत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पात एकुण ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या सर्वत्र जाणवत असते. यंदाच्या पाणी टंचाईची चाहूल मार्च महिन्याच्या मध्यंतरात जाणविण्यास सुरवात झाली आहे. पाणीसाठा कमी होत असल्याने गावात पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांना पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करत जावे लागत आहे. अशातच धाराशिव जिल्ह्यात देखील आता याची सुरवात झाल्याचे पाहण्यास मिळत असून जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ ३४ टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. 

Dharashiv News
Thane Police : एकाच रात्रीत १४ घरफोड्या; १०० सीसीटीव्ही तपासणीनंतर दोघे चोरटे ताब्यात

केवळ एकच प्रकल्प पूर्ण भरलेला 

धाराशिव जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांपैकी केवळ एक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. तर ३ प्रकल्पात ७५ टक्केच्या वर पाणीसाठा आहे. ३९ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के, ८४ प्रकल्पात २६ ते ५० टक्के, ५४ प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी, ४३ प्रकल्प जोत्याखाली तर एका प्रकल्पाने तळ गाठला आहे. एकुण प्रकल्पात २४९.९३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान आगामी काळात पाण्याचा जपुन वापर न केल्यास टंचाई निर्माण होवु शकते त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा अस आवाहन प्रशासनाने केले आहे.

Dharashiv News
Ration Shop : रेशन दुकानात मिळणार बचत गटाची उत्पादने; धाराशिव जिल्ह्यातून पहिला उपक्रम

वाशिमच्या अडाण प्रकल्पात ६० टक्के जलसाठा
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प असलेला अडाण धरणात सध्या ६० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प असूनही वाशिम जिल्ह्यातील केवळ कारंजा शहरला या धरणातून पाणीपुरवठा होतो. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहर आणि परिसरातील दोन हजार हेक्टर शेतीचे सिंचन होते. अडाण प्रकल्पात सध्या ६० टक्के जलसाठा शिल्लक असल्यामुळे कारंजा शहर आणि दारव्हा शहरला पाणी टंचाईची शक्यता नसल्याचे अडान प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com