Ration Shop : रेशन दुकानात मिळणार बचत गटाची उत्पादने; धाराशिव जिल्ह्यातून पहिला उपक्रम

Dharashiv News : महिला बचत गटाकडून अनेक लघु उद्योग चालवले जातात. बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने विक्रीसाठी हक्काची अशी बाजारपेठ मिळत नसते. यामुळे उत्पादित केलेला माल विक्री होत नाही
Ration Shop
Ration ShopSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : गोरगरिबांना रेशन दुकानावर स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जाते. दार महिन्याला याचे वाटप करण्यात येत असते. मात्र आता या रेशनच्या स्वस्त धान्य दुकानात महिला बचत गटाची उत्पादने देखील उपलब्ध होणार आहेत. अर्थात बचत गटाने तयार केलेली उत्पादने रेशन दुकानावर विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. असा उपक्रम राबविणार धाराशिव जिल्हा राज्यातील पहिला ठरणार आहे. 

रेशन दुकानातून रेशन कार्ड धारकांना अल्प दरात धान्य उपलब्ध करून दिले जात असते. दार महिन्याला याचे वाटप करण्यात येत असते. दरम्यान याच स्वस्त धान्य दुकानांमध्ये मिनी बँक चालवत पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यानंतर धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अनोखी संकल्पना राबवत रेशनच्या दुकानात महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Ration Shop
Sangli: दाराबाहेर बकऱ्याचं मुंडकं, हळद-कुंकू वाहिलेलं लिंबू अन् काळ्या बाहुल्या; सागंलीत जादूटोण्याचा प्रकार

बचत गटांना मिळणार बाजारपेठ 

महिला बचत गटाकडून अनेक लघु उद्योग चालवले जातात. बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने विक्रीसाठी हक्काची अशी बाजारपेठ मिळत नसते. यामुळे उत्पादित केलेला माल विक्री होत नाही. या अनुषंगाने रेशन दुकानात या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रेशन दुकानात वस्तू विक्रीस ठेवल्याने ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल आणि महिलांच्या हाताला काम मिळणार आहे. 

Ration Shop
Thane Police : एकाच रात्रीत १४ घरफोड्या; १०० सीसीटीव्ही तपासणीनंतर दोघे चोरटे ताब्यात

राज्यातला पहिला उपक्रम 

महिला सक्षमीकरणासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची अनोखी संकल्पना राबविली आहे. याला स्वस्त धान्य दुकानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिला बचत गटांकडूनही जिल्हाधिकारीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यामुळे हक्काची बाजारपेठ आणि रोजगार वाढेल असा विश्वास महिलांना आहे. अर्थात महिला बचत गटांना स्थानिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यभरातला पहिला उपक्रम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com