Sangli: दाराबाहेर बकऱ्याचं मुंडकं, हळद-कुंकू वाहिलेलं लिंबू अन् काळ्या बाहुल्या; सागंलीत जादूटोण्याचा प्रकार

Witchcraft Incident in Sangli: सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महिलेच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sangli
SangliSaam
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने करणी आणि भानामतीचा प्रकार केला आहे. पहाटे महिलेने दार उघडले. तेव्हा त्यांच्या दाराबाहेर जादूटोण्याचे साहित्य आढळून आले.

बकऱ्याची मुंडके, सुई टोचलेल्या लिंबू, तसेच तीन नारळाला काळ्या बाहुल्या बांधल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजीव बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलाचे प्रबोधन केले.

इस्लामपूर उरून भागात एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेला त्यांच्या घराबाहेर जादूटोणा करण्याचे साहित्य आढळून आले. महिलेच्या दारात बकऱ्याचं मुंडकं, बकऱ्याची चार पाय रंगीत दोरीने बांधलेले होते. त्यावर लिंबू, सुई आणि पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळ्या बाहुल्या दोरीने बांधून त्यावरही टाचण्या टोचल्या होत्या.

Sangli
Maharashtra Rains: सांगली-सातारा अन् कोल्हापूरमध्ये वरुणराजा बरसला; कुठे विजांचा कडकडाट, तर कुठे शेतीला फटका; राज्यात कुठे पाऊस पडणार?

तर, २१ अर्ध कापलेले लिंबू त्यावरही सुई टोचलेल्या होत्या. शिवाय मिरच्या, पपईच्या तुकड्यांवर हळद कुंकू वाहिलेल्या होत्या. याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी महिलेच्या दाराजवळ गर्दी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजीव बनसोडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली.

Sangli
Sonu Sood Wife: नशीब बलवत्तर...! बोनेटचा चेंदामेंदा, काचा फुटल्या; सोनू सूदच्या बायकोच्या कारला झालेल्या अपघाताची भयंकर दृश्ये

संजीव बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेच्या कुटुंबाचे आणि नागरिकांचे प्रबोधन केले. तसेच त्यांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com