Sonu Sood Wife: नशीब बलवत्तर...! बोनेटचा चेंदामेंदा, काचा फुटल्या; सोनू सूदच्या बायकोच्या कारला झालेल्या अपघाताची भयंकर दृश्ये

Mumbai Nagpur Expressway accident News: बॉलिवूड अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Accident
AccidentSaam
Published On

बॉलिवूड अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूदच्या पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. ही घटना २४ मार्च २०२५ रोजी रात्री घडली. सोनाली आपल्या बहिणी आणि पुतण्यासोबत प्रवास करत होती. ​यादरम्यान, तिच्या गाडीचा अपघात झाला. सोनालीची कार ट्रकखाली चिरडली गेली. सध्या सोनालीवर नागपूरमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सोनू सूदची बायको बहिणी आणि पुतण्यासोबत प्रवास करीत होती. कार तिचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. सोनालीची कारची एका ट्रकला धडक बसली. या धडकेत कारचा चेंदा मेंदा झाला. कारच्या बोनेटचा चुराडा झाला. तसेच कारच्या काचाही फुटल्या. सुदैवाने या भीषण अपघातानंतर सर्वजण सुखरूप आहेत.

Accident
Prasanna Shankar: 'XL साईजचं कंडोम आणा, हॉटेल बुक केलंय', उद्योगपतीच्या पत्नीचा कारनामा, 'असा' केला भंडाफोड

या अपघातानंतर सोनू सूदने त्याच्या पत्नीच्या अपघाताबाबत अधिकृतपणे भाष्य कुठेही केलेलं नाही. मात्र, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सोनू सूद तातडीने मुंबईहून नागपूरच्या दिशेने निघाला आहे. सध्या या अपघाताचे फोटो सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत असून, सोनू सूदच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Accident
Shocking: मेहुणीसाठी दाजी झाला वेडापिसा, मित्राच्या मदतीने बायकोचा काढला काटा

सोनू सूद मुळचा नागपूरचा आहे. नागपूरच्या बहीरामजी टाऊन परिसरात सोनू सूद आणि त्याचे सासरची मंडळी राहतात. अपघातादरम्यान, गाडीचे एअर बॅग वेळेवर उघडल्याने कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. अपघातग्रस्त कार सध्या सोनेगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, या संदर्भात नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com