Akola : शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; FDAची राज्यभर मोहीम, अकोल्यात १,८४७ शिक्षकांना प्रशिक्षण

Akola Junk Food Ban News : शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड आणि HFSS पदार्थांच्या विक्री व जाहिरातींवर आळा घालण्यासाठी FDAची राज्यभर मोहीम. अकोल्यात १,८४७ शिक्षकांना प्रशिक्षण.
Akola Tukaram Mundhe FDA News
Akola Tukaram Mundhe FDA NewsAI Image
Published On
Summary
  • विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जंक फूड आणि HFSS पदार्थांवर नियंत्रण ठेवणार

  • ५० मीटरचा परिसर जंक फूडवर बंदी

  • सहा कार्यशाळांमधून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा नियमांचे प्रशिक्षण

  • ‘ईट राईट स्कूल’वर भर

अक्षय गवळी, अकोला

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या जंक फूड आणि HFSS म्हणजेच हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आता कंबर कसली आहे. शाळांच्या परिसरात अशा पदार्थांची विक्री आणि जाहिरात रोखण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सकस आहाराबाबत जनजागृती करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शिक्षक आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

अकोला जिल्ह्यात FDA आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत सहा कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळांमध्ये जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८४७ शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला. शाळेपासून ५० मीटरच्या परिसरात चिप्स, कँडी, शीतपेय, बेकरी पदार्थ तसेच अधिक तेलात तळलेले आणि चरबी, साखर व मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ विक्री किंवा जाहिरातीसाठी ठेवण्याबाबत नियमांची माहिती या कार्यशाळांमध्ये देण्यात आली.

Akola Tukaram Mundhe FDA News
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अशा पदार्थांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जंक फूडच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या समस्यांचा धोका वाढण्यासोबतच एकाग्रतेवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. शालेय कँटीनमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच ‘ईट राईट स्कूल’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या डब्यात ताजी फळे, उकडलेली कडधान्ये आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Akola Tukaram Mundhe FDA News
Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अकोल्यातील सहाय्यक आयुक्त डॉ. देवानंद वीर यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, नियमांची शाळांच्या परिसरात प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, यावर प्रशासनाला नियमित लक्ष ठेवावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com