Ratnagiri: नदीत पोहण्यासाठी उडी मारली, पण परत बाहेर आलेच नाहीत; तिघांचा बुडून मृत्यू

3 Youths Drown While Swimming in Jagbudi River: रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीमध्ये पोहताना ४ तरुण बुडाले. यामधील एका तरुणाला वाचवण्यात यश आले. तर ३ तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
Ratnagiri:  नदीत पोहण्यासाठी उडी मारली, पण परत बाहेर आलेच नाहीत; तिघांचा बुडून मृत्यू
3 Youths Drown While Swimming in Jagbudi RiverSaam Tv
Published On
  • रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीत तिघांचा बुडून मृत्यू

  • खेड तालुक्यात नदीत पोहताना तरुण बुडाले

  • दुसरीकडे गोंदियामध्ये बोट बुडाली

  • या घटनेमध्ये २ मुलांचा मृत्यू झाला

अमोल कलये/ शुभम देशमुख, साम टीव्ही

रत्नागिरीमध्ये नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खेडमधील जगबुडी नदीच्या डोहात पोहताना ही घटना घडली. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने चार तरुण बुडाले. यामधील एका तरुणाला वाचवण्यात यश आले. पण ३ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या खेड आणि भोस्ते गावांच्या दरम्यान असलेल्या जगबुडी नदीच्या डोहात पोहण्यासाठी चार तरुण गेले होते. नदीमध्ये पोहण्यासाठी त्यांनी उडी मारली. पण पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे नदीत चौघेही बुडाले. नदीजवळ असलेल्या काही नागरिकांनी तात्काळ नदीत उड्या घेत एकाचा जीव वाचवला. पण या घटनेत ३ तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Ratnagiri:  नदीत पोहण्यासाठी उडी मारली, पण परत बाहेर आलेच नाहीत; तिघांचा बुडून मृत्यू
Shocking: दागिन्याच्या कारखान्यात मोठी दुर्घटना, विषारी गॅसमुळे ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

गोंदियामध्ये फिरायला गेलेला दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयातील ही घटना आहे. जलाशयामध्ये नाव उलटली. या घटनेत सात मुलं थोडक्यात बचावली. पण दोघे जण बुडाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

Ratnagiri:  नदीत पोहण्यासाठी उडी मारली, पण परत बाहेर आलेच नाहीत; तिघांचा बुडून मृत्यू
Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

बोदल कसा जलाशयात फिरण्यासाठी ९ मुलांचा ग्रुप गेला होता. ते तलावातील मच्छीमारांच्या नावमध्ये नौका विहार करण्यासाठी गेले होते. त्या नऊ मुलांमधून दोन मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोडे अशी दोन्ही मृत मुलांची नावं आहेत.

ते बरबसपुरा येथे राहणारे होते. घटनेची माहिती मिळतात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय भाऊ रहांगडाले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणी मदत कार्य सुरू केले आहे.

Ratnagiri:  नदीत पोहण्यासाठी उडी मारली, पण परत बाहेर आलेच नाहीत; तिघांचा बुडून मृत्यू
Shocking: लंडनमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू, ३६ व्या मजल्यावरून खाली पडले; हत्या की आत्महत्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com