3 वर्षांच्या मुलात एवढी क्रुरता कुठून आली? प्री-स्कूलमध्ये लहानग्याला बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगरातील एका प्रीस्कूलमध्ये २३ महिन्यांच्या चिमुकल्याला कथितपणे ३ वर्षांच्या मुलाकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शाळेच्या निष्काळजीपणाचा आरोप करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे.
3 वर्षांच्या मुलात एवढी क्रुरता कुठून आली? प्री-स्कूलमध्ये लहानग्याला बेदम मारहाण
3 वर्षांच्या मुलात एवढी क्रुरता कुठून आली? प्री-स्कूलमध्ये लहानग्याला बेदम मारहाण Saam Tv
Published On

प्री स्कूल आणि डे केअरमध्ये मुलांच्या होणारा छळ तसा नवा नाही....या घटना तुम्ही अनेकदा पाहत असतात आणि ऐकत असतात...मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये समस्त पालकवर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमधील 23 महिन्यांच्या मुलाला तीन वर्षांच्या मुलानं बेदम मारहाण केल्याचा अतिशय धक्कादायक आणि पालकांना सावध करणारा प्रकार घडलाय. होय...तीन वर्षांच्या मुलानं दोन वर्षांच्या मुलानं बेदम मारहाण केलीय...हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र हे घडलंय प्री स्कूलमधल्या बेजबाबदार कर्माचाऱ्यांमुळे...

नेमकं काय घडलं?

संभाजीनगरातल्या नामांकित प्री स्कूलमध्ये

पालकांनी 2 वर्षांच्या चिमुकल्याला सोडलं

केअर टेकर मुलांना आत कोंडून बाहेरून दरवाजा लॉक करून निघून गेली

त्यानंतर एका 3 वर्षांच्या मुलानं द

चिमुकल्याच्या चेहरा, नाक, ओठ, छाती, पाठ आणि तळपायावर जखमा

घटनेनंतरही मुलाला रुग्णालयात न नेल्याचा आरोप, 6 जणांविरोधात गुन्हा

दरम्यान, 23 महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल 45 मिनिटं मारहाण झाली, तेव्हा एकही शिक्षक तिथे उपस्थित नसल्याचं समोर आलंय. इतकंच नव्हे तर हे सगळं प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनानं केस मागे घेण्यासाठी 10 लाख रुपये आणि मुलाला 3 वर्षे मोफत शिक्षणाचं आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप चिमुकल्याच्या पालकांनी केलाय.

3 वर्षांच्या मुलात एवढी क्रुरता कुठून आली? प्री-स्कूलमध्ये लहानग्याला बेदम मारहाण
संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

एकीकडे, या गंभीर प्रकारानंतर आता शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून शाळेची चौकशी करण्यात येतेय. तर दुसरीकडे, या अमानुष कृत्यामुळे या चिमुरड्याच्या बालमनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसात एकूण 7 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. केवळ शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणाच नाही, तर मोठा बेकायदेशीर कारभारही समोर आलाय. या नामांकित प्रीस्कूलकडे महानगरपालिकेची कोणतीही आवश्यक परवानगी नसल्याची खळबळजनक माहिती समोर आलीये. त्यामुळे परवानगी नसतानाही राजरोसपणे प्रीस्कूल सुरू ठेवणाऱ्या शाळा व्यवस्थापनांत इतकी मग्रुरी येते कुठून?. इतकंच नव्हे तर 3 वर्षांच्या चिमुकल्यामध्ये इतकी क्रुरता येते कुठून?, हाच खरा प्रश्न आहे...

माधव सावरगावे, साम टिव्ही न्यूज, छत्रपती संभाजी

3 वर्षांच्या मुलात एवढी क्रुरता कुठून आली? प्री-स्कूलमध्ये लहानग्याला बेदम मारहाण
Nasrapur case : नसरापूर अत्याचारात नराधम दोषी, 29 जूनला भीमराव कांबळेला फाशी? कोर्टात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com