Titwala crime news: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग, शरीराला चुकीच्या पद्धचीने स्पर्श करायचा अन्...

Titwala harassment case: ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यामधील अल्पवयीन मुलींशी छेडछाड केल्याप्रकरणी ५९ वर्षीय क्रिकेट कोचला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता वाढली आहे.
Beed crime news
Beed crime newsSaam tv
Published On

ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारच्या दोन अल्पवयीन मुलींशी छेडछाड केल्याप्रकरणी खासगी क्रिकेट कोचला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त कऱण्यात येतेय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वय ५९ वर्षे असून तो खासगी क्रिकेट कोच म्हणून काम करत होता. पीडित मुलींचं वय १२ ते १४ वर्षे असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात आरोपीने एका मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यानंतर नुकतंच आता दुसऱ्या मुलीशीही अशाच प्रकारे विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

Beed crime news
Road accident India: देवीच्या दर्शनाहून परतताना काळाने गाठलं! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

या घटनेची माहिती दुसऱ्या मुलीने आपल्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने परिसरातील लोकांशी चर्चा केली. ज्यावेळी हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा लक्षात आलं की, आरोपीने यापूर्वीही शेजारच्या मुलीशी अशाच प्रकारे वर्तन केलं होतं. यानंतर दोन्ही पीडितांच्या पालकांनी बुधवारी कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Beed crime news
Ladki Bahin Yojana: खुशखबर! या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹६००० जमा होणार; ४ महिन्याचा हप्ता एकत्र येणार?

पोलिसांनी केली कारवाई

तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढलीये.

Beed crime news
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोर

पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या तपासातून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com