वंदे भारत एक्स्प्रेस
Vande Bharat ExpressSaam Tv

Vande Bharat Express : आज ३ नव्या वंदे भारत धावणार, कोणत्या शहरामधून कधी सुटणार? जाणून घ्या सविस्तर

Three Vande Bharat Express start Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ३ वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करणार आहेत. या ट्रेनचं वेळापत्रक कसं राहील, ते आपण जाणून घेवू या.
Published on

मुंबई : राज्यात आजपासून तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर या नव्या वंदे भारत धावणार आहेत. पुणे, कोल्हापूर, हुबळी मार्गावर धावणारी ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन ही आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

नागपूर-सिकंदराबाददरम्यान असणारी वंदे भारत ट्रेन २० डब्यांची असल्याची माहिती मिळतेय. ही ट्रेन आठवड्यामधून सहा दिवस धावणार आहे. उद्घाटनानंतर कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूरवरून सुटणार (Three Vande Bharat Express start Today) आहे. तसेच पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरून आणि नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत नागपूरवरून ४ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.

कसं असेल वेळापत्रक ?

कोल्हापूर ते पुणे ते कोल्हापूर (Kolhapur Pune) ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ती कोल्हापूर ते पुणे आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी असणार आहे, तर शनिवार आणि सोमवारी कोल्हापूरवरून सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटणार (Vande Bharat Express) आहे. तर पुणे ते कोल्हापूर वंदे भारत १८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही ट्रेन प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पुण्यावरून दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस
Vande Bharat Metro Train : वंदे भारत मेट्रोचं तिकीट फक्त ३० रुपये! कुठे थांबणार, प्रवासाला किती वेळ लागणार? वाचा सविस्तर

कसा आहे मार्ग ?

कोल्हापूर ते पुणे (Nagpur-Secunderabad) या वंदे भारत ट्रेनचे थांबे मिरज, सांगली, किलर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा आहेत. तर पुणे ते हुबळी ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. या एक्स्प्रेसचा मार्ग पुणे ते हुबळी (Pune Hubli) असणार आहे. ही ट्रेन १९ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी पुण्यावरून दुपारी ही गाडी दोन वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. तर हुबळी ते पुणे ही वंदे भारत १८ सप्टेंबपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवार, शुक्रवार अन् रविवारी ही गाडी रोज हुबळीवरून सकाळी पाच वाजता सुटणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस
Vande Bharat Train: एक दोन नव्हे आजपासून १० वंदे भारत ट्रेन! 'या' राज्यांमध्ये धावणार; जाणून घ्या मार्ग, वेळापत्रक अन् A TO Z माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com