खासदाराच्या नातवाला बोटाला शाई लावणं भोवलं, प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

Minor Inked At Polling Booth In Maharashtra: झेडपी निवडणुकीदरम्यान खासदाराच्या नातवाच्या बोटाला शाई लावल्याचा प्रकार उघडकीस आला. नियमभंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
District administration takes action after underage child ink controversy at polling booth.
District administration takes action after underage child ink controversy at polling booth.Saam Tv
Published On
Summary

झेडपी निवडणुकीदरम्यान नियमभंगाचा गंभीर प्रकार उघड

अल्पवयीन मुलाच्या बोटाला शाई लावल्याचा व्हिडिओ व्हायरल

जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन

निवडणूक प्रक्रियेत शिस्त पाळण्याचा प्रशासनाचा कडक इशारा

राज्यात शनिवारी झेडपीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडूनच नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. सांभाजीनगरचे खासदार संदीपान भूमरे यांचे चिरंजीव पैठण मतदारसंघाचे आमदार विलास भूमरे यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात बोटाला शाई लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ माध्यम आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने आता जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

District administration takes action after underage child ink controversy at polling booth.
बारामतीनंतर आणखी एक ठिकाणी विमान कोसळलं; अपघाताची A टू Z माहिती समोर

निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाचोड येथील मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दिलीप नरवडे ज्यांच्या देखरेखीखाली हा प्रकार घडला, तसेच मतदान अधिकारी आणि आणखी एक कर्मचारी ज्यांनी अल्पवयीन मुलांच्या बोटाला शाई लावली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

District administration takes action after underage child ink controversy at polling booth.
अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात? उत्तर मिळाले पाहिजे; राष्ट्रवादीच्या आमदाराने मनातलं सगळं सांगितलं

मिळालेल्या माहितीनुसार, विलास भूमरे यांच्या मुलाला शाई लावणाऱ्या संगीता केदार यांचे निलंबन केले गेले आहे. तसेच होमगार्ड रेणूका बोंबले यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे तीनही कर्मचारी पैठण तालुक्याचे असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी म्हणाले निवडणूक कर्तव्यात चूक केल्याचे स्पष्ट झाल्याने आज निलंबनाचे आदेश देण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. सदर कारवाईमुळे राजकीय आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com